मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग नवव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज बुधवारी देशात पेट्रोल आणि स्थिर आहे. युरोपात करोनाचा कहर वाढला असून काही देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे इंधन मागणीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात मागील १३ नोव्हेंबरपासून कच्च्या तेलाचा भाव वाढत आहे. त्यात आतापर्यंत १८ टक्के वाढ झाली आहे. तेलाचा भाव प्रती बॅरल ५०.३४ डॉलरपर्यंत गेला आहे. बार्कलेज या संस्थेच्या अंदाजानुसार प्रती बॅरल १० डॉलरची वाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी ५.८ रुपये लीटरमागे वाढ होते. तर यामुळे महागाई दरात किमान ०.३४ टक्क्याची वाढ होते. पुढील तीन ते सहा महिन्यात महागाईचा भडका उडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, देशातील इंधन वितरक कंपन्यांनी दरवाढीतून काहीशी उसंत घेतली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. नऊ दिवसांपूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरनंतर झालेल्या १५ वेळा दरवाढीने पेट्रोल २.५५ रुपयांनी महागले होते. २० नोव्हेंबरनंतर १२ वेळा डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. ज्यात डिझेलचा भाव ३.४१ रुपयांनी वाढला आहे. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. अमेरिकेत तेलाचा साठा वाढला आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार ११ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेत १.९७ दशलक्ष बॅरल तेलाचा साठा आहे. याआधीच्या आठवड्यात तो १.१४ दशलक्ष बॅरल होता. तेल साठा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. आज बुधवारी सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ८ सेंट्सने कमी होऊन ५०.६८ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६ सेंटने कमी होऊन ४७.५६ डॉलर प्रती बॅरल झाला. युरोपात करोनाचा कहर वाढला आहे. यामुळे काही देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे इंधन मागणीवर परिमाण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2K9c1nV
No comments:
Post a Comment