वॉशिंग्टन: करोना संसर्गाच्या थैमानाला सामोरे जाणाऱ्या अमेरिकेत सुरू करण्यात आले आहे. करोना लसीचा पहिला डोस न्यूयॉर्कमधील परिचारिका सँड्रा लिंडसे यांना देण्यात आली. करोना लसीकरणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. करोनाने मागील आठवड्यातील बुधवारी विक्रमी ३,२६३ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता फायझर आणि बायोएनटेकच्या कोविड-१९ लशीला आणीबाणीच्या काळातील वापरासाठी हिरवा झेंडा दाखण्यात आला. अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीची बैठकीतील आठ तासांच्या लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस ‘एफडीए’ला करण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेण्यात आला. लशीच्या वापराच्या बाजूने १७ व विरोधात ४ मते पडली व एक सदस्य तटस्थ राहिला होता. ही लस १६ वर्षावरील व्यक्तींना देण्यात येणार आहे. वाचा: अमेरिकेत मंजुरी मिळाल्यानंतर करोनाची पहिली लस घेणाऱ्या परिचारिका सँड्रा लिंडसे यांनी सांगितले की, मी आज खूपच आशावादी असून एक मोठा दिलासा मिळाल्याची भावना मनात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. अमेरिकेचे अभिनंदन, पहिला डोस देण्यात आला आहे. जगाचेही अभिनंदन!, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत एक कोटी २४ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन लाख ९९ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. वाचा: संपूर्ण लसीकरणाचे काय? ‘फायझर’ने तूर्तास आणीबाणी काळातील लसवापरासाठी अर्ज केला असून, ही शिफारस त्यापुरतीच मर्यादित आहे. संपूर्ण लसीकरणासाठी ‘फायझर’ला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. इतर लशींप्रमाणेच फायझरच्या लशीसोबतही लिखित वैद्यकीय सूचना असतील. यामध्ये गंभीर अॅलर्जीचा इतिहास असलेल्या तसेच लशीतील घटकांची अॅलर्जी असलेल्यांसाठी धोक्याचा इशारा असेल. वाचा: दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत करोना लस निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध टीव्ही शोच्या प्रोडक्शन टीमला उद्देशून हे ट्विट केले आहे. अमेरिकेतील लस निर्मिती हा एक चमत्कार असून याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेच पाहिजे असे ट्विट ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WfWdCd
No comments:
Post a Comment