Breaking

Tuesday, December 15, 2020

पुणे: लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न https://ift.tt/2KrJOIL

पुणे: शहरातील नामांकित सराफ व्यावसायिकाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावर नामांकित सराफ व्यावसायिकाचे दुकान आहे. दिवसभर ते दुकानातच होते. रात्री आठच्या सुमारास त्यांनी छातीमध्ये पिस्तूलातून गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणाचा पोलिस तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oX8wzC

No comments:

Post a Comment