Breaking

Monday, December 14, 2020

कच्च्या तेलात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव https://ift.tt/34cs2Ar

मुंबई : करोना लसीकरण काही देशांमध्ये सुरू झाल्याने अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. करोना साथ नियंत्रणात आल्यास तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलावर दबाव निर्माण झाला आहे. तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि स्थिर ठेवला आहे. सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल २.५५ रुपयांनी आणि डिझेल ३.४१ रुपयांनी महागले होते. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचा भाव होता. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. ओपेकच्या ताज्या अहवालानुसार करोनाच्या प्रभावामुळे भविष्यातील तेलाची मागणी ९.७७ दशलक्ष बॅरलने कमी केली आहे. त्यामुळे तेलाच्या विक्रीचा आकडा ८९.९९ दशलक्ष बॅरलपर्यंत खाली आला आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या दरात किरकोळ घसरण झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.०३ डॉलरने कमी होऊन ४६.९६ डॉलर प्रती बॅरल आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ०.३२ डॉलरने वाढला. ब्रेंट क्रूड प्रती बॅरल ५०.२० डॉलर आहे. लसीच्या उत्साहामुळे आर्थिक सुधारणेच्या आशा वाढल्या आणि कच्च्या तेलाची मागणी वाढली. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २.८ टक्क्यांनी वाढले व ते ४६.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अमेरिकी क्रूड साठ्यात अनपेक्षित वाढ झाले तरीही दरांवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला नाही. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, अमेरिकी क्रूडसाठ्यात १५.२ दशलक्ष प्रति बॅरल एवढी वाढ झाली. ती १.४ दशलक्ष बॅरलने घटणार असा अंदाज होता. वाचा : अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढल्याचा परिणाही बाजारावर झाला. हाँगकाँग बाबतच्या राजकीय चिंतेमुळे अमेरिका काही चिनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे काही अहवालांत सांगण्यात आले. ओपेक आणि रशियाने जानेवारी २०२१ पासून पुढे तेलाचे उत्पादन काहीसे वाढवून ते दररोज ५००,००० बॅरल्स एवढे करण्याचे मान्य केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WfTb0P

No comments:

Post a Comment