Breaking

Monday, December 14, 2020

आंतरधर्मीय विवाहानंतर... पती-दीर तुरुंगात, महिला रुग्णालयात https://ift.tt/37k4RpS

मुरादाबाद : आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांबद्दल उत्तर प्रदेशात वाढत चाललेला रोष आता एखाद्याच्या जीवावर बेतताना दिसतोय. नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात करणाऱ्या महिलेला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा व्हिडिओ समोर आला होता. आठवड्याभरापूर्वी तिला यूपी पोलिसांकडून मुरादाबादच्या महिला शेल्टर होममध्ये धाडण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र पोटदुखी आणि रक्तस्रावानंतर महिलेला शेल्टर होममधून रुग्णालयात हलवण्यात आलं. महिलेला गर्भपाताला सामोरं जावं लागल्याची माहिती मिळतेय. महिलेच्या पतीला आणि दिराला पोलिसांनी तुरुंगात टाकलंय. चार महिन्यांपूर्वी अर्थात जुलै महिन्यात या महिलेनं मुस्लीम तरुणासोबत विवाह केला होता. विवाहासाठी तीन स्वीकारला होता. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी आपल्या पतीसोबत विवाहाची नोंदणी करण्यासाठी जात असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना रोखण्यात आलं. हिंदू संघटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या महिलेला, तिच्या पतीला आणि दिराला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेला शेल्टर होममध्ये धाडण्यात आलं. इथं तिचा झाल्याचं समजतंय. वाचा : वाचा : विवाहानंतर संबंधित महिला गेल्या पाच महिन्यांपासून मुरादाबादमध्ये राहत होती. २२ वर्षांच्या महिलेनं स्वत:च्या मर्जीनं इस्लाम धर्म कबूल केल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात सक्रीयता दाखवत महिलाचा पती आणि दीर यांच्यावर नव्या धर्मांतरण कायद्यानुसार कारवाई करत त्यांना तुरुंगात टाकलं. महिलेचं म्हणणं होतं की आपला विवाह जुलै महिन्यातच झालाय, परंतु पोलिसांनी मात्र तिचं काहीही ऐकून घेण्यास नकार दिला. तिला शेल्टर होममध्ये धाडण्यात आलं. महिलेला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शेल्टर होममध्ये तीन दिवसांत दोन वेळा पोटात दुखत असल्याची आणि रक्तस्रावाची तक्रार या महिलेनं केली होती. त्यानंतर तिला दोन वेळा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र महिलेचा गर्भपात झाल्याच्या बातमीला नकार दिलाय. तिच्या उदरात वाढणारा तीन महिन्यांचा गर्भ सुरक्षित असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37gPOgv

No comments:

Post a Comment