Breaking

Monday, December 14, 2020

पुणे: अनैतिक संबंधांचा संशय; तरुणाला ५ जणांनी अडवले अन्... https://ift.tt/3qRwUVj

म. टा. प्रतिनिधी, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच जणांनी तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार येथे घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. किरण कैलास इंगळे (वय २२), शेखर अंकुश दिघे (वय २०) आणि जय पांडुरंग निकम (वय २१, तिघे रा. विठ्ठलनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित ओंबासे (वय ३४, रा. आंबेगाव खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार अजित यांचा भाऊ अमर हा दुचाकीवरून रविवारी मार्केट यार्ड येथे जात होता. त्या वेळी जांभूळवाडी रोडवरील लिपाणे वस्ती येथे पाच जण कारमधून आले. त्यांनी अमरच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. अमर एका महिलेबरोबर बोलत असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nkM4Qt

No comments:

Post a Comment