Breaking

Tuesday, April 13, 2021

दोन मास्क वापरा, करोनाला दूर ठेवा; तज्ज्ञांचा सल्ला https://ift.tt/32eBIc0

टाइम्स वृत्त, नवी दिल्ली : हल्ली सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर एक नव्हे, तर एकावर एक दोन मास्क लावलेल्या व्यक्ती दिसू लागल्या आहेत. हा करोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्याचा प्रकार आहे की अनावश्यक देखावा, असा प्रश्नही पडला असेल. पण देशात थैमान घालत असताना हे '' वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'एक आणि त्यावर वापरता येईल. किंवा एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे. वापरत असाल, तर मात्र दुसऱ्या मास्कची गरज नाही,' असा सल्ला ''च्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे डॉ. रोमेल टिकू देतात. 'गर्दीच्या ठिकाणी, सुरक्षित अंतर राखणे कठीण असताना, दुहेरी मास्क वापरणे योग्य आहे. अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरित्या बसत नाहीत, काही सैल असतात. अशावेळी दोन मास्क वापरल्याने कमी करता येईल,' असे ते म्हणाले. अमेरिकेतील 'सेंटर फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन'मधील (सीडीसी) अभ्यासानुसार दुहेरी मास्कचा सल्ला देण्यात आला आहे. दुहेरी मास्क वापरल्याने अधिक चांगले संरक्षण मिळू शकते, असे कोलकात्याच्या बेल व्ह्यू क्लिनिक येथील वैद्यकीय सल्लागार राहुल जैन यांनी सांगितले. मास्क चेहऱ्यावर नीट बसला नसेल. इलॅस्टिक सैल झाले असेल, अशा वेळी दुहेरी मास्क उपयुक्त ठरतो. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते ही योग्य पद्धत नाही. 'मास्कला छिद्र असेल, तर उपाय म्हणून दुहेरी मास्क वापरणे योग्य. मात्र ही सरसरकट पद्धत असू शकत नाही. योग्य पद्धतीने घातलेला एक मास्क तुम्हाला चांगले संरक्षण देतो,' असे मत बेंगळुरूच्या अपोलो स्पेशालिटी रुग्णालयाचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र मेहता यांनी व्यक्त केले. दुहेरी मास्क सुरक्षित असल्याबाबत कोणताही शास्त्रीय अभ्यास झाला नसून एन-९५ मास्क किंवा तीन पदरी कापडी मास्क पुरेसा आहे, असे डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3shZrTc

No comments:

Post a Comment