Breaking

Tuesday, April 13, 2021

विस्थापित मुलांची माहिती द्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश https://ift.tt/3uFWFsK

वृत्तसंस्था, नवी दिल्ली विस्थापितांच्या मुलांची संख्या आणि त्यांची स्थिती याबद्दलची माहिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिला आहे. करोनाकाळात विस्थापित करण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सरन्यायाधीश , न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मणियन यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांना या प्रकरणी पक्षकार म्हणून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. चाइल्ड राइट्स ट्रस्ट आणि बेंगळुरूमधील एका रहिवाशाने ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने आठ मार्च रोजी सर्व राज्यांना पक्षकार बनवून नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील जयना कोठारी बाजू मांडत आहेत. या याचिकेत असे म्हटले आहे की, करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने लागू केला. या कालावधीत विस्थापितांच्या मुलांना सर्वाधिक फटका बसला आणि सर्वांत असुरक्षित लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. स्थलांतरित श्रमिकांना कल्याणकारी उपाययोजना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रयत्न झाले असले, तरी जिल्ह्यांच्या ठिकाणी मदत शिबिरांमध्ये किंवा विलगीकरण केंद्रांमध्ये राहत असलेल्या विस्थापित महिला आणि मुलांसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकार किंवा राज्यांतर्फे कोणताही अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, याकडे या याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. अभूतपूर्व लॉकडाउनमुळे स्थलांतरितांवर मोठे संकट कोसळले. स्थलांतरित श्रमिकांच्या मुलांवर आणि त्यांच्या मूलभूत तसेच मानवी हक्कांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. या मुलांवरील वर्तमान संकट स्पष्टपणे दिसत आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. नेमकी संख्या माहीत नाही लॉकडाउनमुळे विस्थापितांच्या मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. शिवाय आजवर स्थलांतरितांची मुले, नवजात मुले आणि गर्भवती किंवा स्तनदा मातांची नेमकी संख्या किती आहे; तसेच त्यांच्या गरजा काय आहेत याविषयी कोणतीच माहिती जाहीर झालेली नाही. विस्थापितांची मुले दुर्लक्षितच राहतात. त्यांना आरोग्य आणि योग्य पोषण; तसेच उत्कर्षासाठी आवश्यक असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच कौशल्य शिक्षण नाकारले जाते. त्यामुळे या मुलांना झोपड्यांमध्ये अस्वच्छ वातावरणात राहावे लागते, याकडे देखील याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32dT3C8

No comments:

Post a Comment