वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेने आता आशियाई विशेषत: दक्षिण आशियाई भागातील रणनिती पुन्हा आखण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत. अमेरिका येत्या दिवसांमध्ये पाकिस्तानसोबतच्या संबंधाबाबत पुर्नआढावा घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानला तालिबानने केलेली मदत भोवण्याची चिन्हे आहेत. अमेरिकन संसदेत अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ब्लिंकन यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या हिताच्या काही गोष्टी या अमेरिकेच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पाकिस्तानसोबत कसे संबंध असावेत याबाबत याचा विचार करण्यात येणार आहे. एंटनी ब्लिंकन यांनी सांगितले की, पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तानशी निगडित मुद्यावर सहभागी होता. तालिबानच्या अनेक लोकांना पाकिस्तानने आश्रय दिला. अमेरिकन संसदेत अमेरिका पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधाचा पुर्नआढावा घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी ब्लिंकन यांना होकारार्थी उत्तर दिले. पाकिस्तानने मागील २० वर्षात ज्याप्रकारे आपली भूमिका बजावली आणि येणाऱ्या काळात कोणती भूमिका असू शकते याचाही विचार करण्यात येणार असल्याचे ब्लिंकन यांनी म्हटले. तालिबानला पाकिस्तानची मदत अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तावर पुन्हा ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही दिवसांमध्ये अनेक प्रांतावर तालिबानने ताबा घेतला. तालिबानला पाकिस्तानने मदत केली असल्याचे म्हटले गेले. काही पाकिस्तानी नेत्यांनी तालिबानला पाकिस्ताननेच मदत केली असल्याचेही म्हटले होते. अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या आणि ९/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनचा खात्माही पाकिस्तानमध्ये केला होता. विशेष म्हणजे, लादेन पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hxFXHN
No comments:
Post a Comment