Breaking

Monday, September 13, 2021

'मुख्यमंत्री' पदावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आपल्या पक्षाला टोला https://ift.tt/3hva16N

जयपूर : केंद्रीय मंत्री आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येतात. आताही अशाच एका वक्तव्यावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सोमवारी नितीन गडकरी राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचले यावेळी त्यांनी जाहीर कार्यक्रमात '' पदाविषयी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. 'जे मुख्यमंत्री पदावर आरुढ होतात ते यासाठी चिंताग्रस्त असतात कारण माहीत नाही केव्हा पदावरून पायउतार व्हावं लागेल' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी जयपूरमध्ये केलंय. उल्लेखनीय म्हणजे नुकतंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. केंद्राच्या निर्देशामुळे विजय रुपाणी यांना पदावरून पायउतार व्हावं लागल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असताना नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा तर होणारच! राजस्थानच्या विधानसभेद्वारे आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी सहभागी झाले होते. राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणं आहे, परंतु सध्या केवळ सत्ता हस्तगत करण्याशीच याचा संबंध लावला जातो. लोकशाहीचं मुख्य लक्ष्य समाजाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहचवणं हा आहे, अशा चार समजुतीच्या गोष्टीही गडकरींनी उपस्थितांना समजावून सांगितल्या. महत्त्वाचं म्हणजेत, गेल्या काही महिन्यांत पदावरून पायउतार व्हावं लागणारे विजय रुपाणी हे भाजपचे चौथे मुख्यमंत्री ठरलेत. भारतीय जनता पक्षाकडून वापरून मुख्यमंत्री पदावर अचानक बदल घडवून आणण्यात आले. उत्तराखंडात त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याऐवजी यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं. पण अवघ्या काही महिन्यांतच त्यांना पुन्हा हटवून पुष्कर सिंह धामी यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवण्यात आलाय. त्यानंतर कर्नाटकात यांच्याऐवजी बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवण्यात आलंय. तर आसाममध्येही निवडणुकीनंतर यांच्याकडे मुख्यमंत्रीपद न सोपवता हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C85rmX

No comments:

Post a Comment