Breaking

Monday, September 13, 2021

'या' किनाऱ्यावर बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणार असाल तर थांबा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मनाई आदेश https://ift.tt/3hwI0vT

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी व भाट्ये किनारी गणपती विसर्जन करणाऱ्यांना लोकांनाचं प्रवेश अन्य लोकांना प्रवेश बंद असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी मनाई सोमवारी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी दिनांक १४ सप्टेंबर व १९ सप्टेंबर रोजी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणार्‍या लोकांनाच प्रवेश देण्याचा जाणार आहे. गणपती विसर्जनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ मधील तरतूदीनुसार या परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. या तरतूदीनुसार दिलेल्या प्राधिकरणास जाहीर नोटीस कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी तात्पुरती राखून ठेवता येईल, आणि असा प्राधिकार विहित करील त्यामुळे शर्तीनुसार प्रवेश असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबतीत कोणत्याही व्यक्तीला अशा राखून ठेवलेल्या जागेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात केली जाईल अशी तरतूद आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी गणपती विसर्जन शिवाय इतर लोकांना फिरण्यास मनाई करण्यात आली असून अन्य लोकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गर्दी होऊन करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nCGyf0

No comments:

Post a Comment