Breaking

Sunday, September 12, 2021

अफगाणिस्तान: तालिबान सरकारच्या घोषणेनंतर 'या' देशाच्या शिष्टमंडळाचा दौरा https://ift.tt/3nmv8My

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली. त्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानचा दौरा केला आहे. अफगाणिस्तानमध्ये राजवटीत दौरा करणारा हा पहिला देश ठरला आहे. तालिबान शांतता चर्चेत कतारने मोठी भूमिका बजावली आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने या दौऱ्याची माहिती दिली. अफगाणिस्तानचा पंतप्रधान मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुर रहमान अल-थानी यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीच्या वेळी कतार अमिरातचे सल्लागार शेख मोहम्मद बिन अहमद अल-मोसनाददेखील हजर होते. या दोन देशांमधील बैठक काबूलमधील राष्ट्रपती भवनमध्ये झाली. तालिबानच्या अनेक महत्त्वाचे नेतेदेखील यावेळी उपस्थित होते. यामध्ये उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, लष्कर प्रमुख आदी उपस्थित होते. तालिबान-कतारमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध, कतारकडून अफगाणिस्तानला करण्यात येणारी मदत, आर्थिक मदत आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तालिबान नेत्यांसोबत झालेल्या भेटीनंतर कतारच्या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई यांची भेट घेत विविध मुद्यांवर चर्चा केली. अमेरिका आणि तालिबान दरम्यानच्या शांतता चर्चेत कतारने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तालिबानने वर्ष २०१३ पासून आपले एक कार्यालय कतारमध्ये सुरू केले आहे. जगातील काही देशांनी कतारच्या माध्यमातून तालिबानशी संपर्क साधत चर्चा केली असल्याचेही म्हटले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3E9FMfB

No comments:

Post a Comment