Breaking

Monday, September 13, 2021

२८ वर्षीय भारतीय नेमबाजाचा बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, मृत्यूचं गूढ कायम https://ift.tt/3zcMmy2

चंदीगड : नमनवीर सिंह बरार याचा मृत्यू झाला आहे. २८ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू नमनवीर याचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. मोहलीस्थित सेक्टर ७१ मध्ये नमनवीर सिंहचं वास्तव्य होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अचानक गोळीचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबीयांनी नमनवीरच्या रुमकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना नमनवीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. गोळीनं नमनवीरच्या डोक्याचा वेध घेतला होता. शेजारीच त्याची पिस्तूल पडलेली होती. या घटनेसंबंधी बरार याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई सुरू केली. नमनवीरचे वडील अरविंदर सिंह बराड हे व्यापारी आहेत. मुलाची खेळाची आवड जोपासण्यासाठी फरीदकोटहून आपलं वास्तव्य त्यांनी मोहालीला हलवलं होतं. २०२० मध्ये नमनवीर याचा विवाह झाला होता. ट्रॅप शूटर बरार यानं याच वर्षी मार्च महिन्यात ''च्या 'मिनिमम क्वालिफिकेशन स्कोअर कॅटेगिरी'मध्ये चौथी रँक मिळवली होती. २०१५ मध्ये दक्षिण कोरियाच्या ग्वांगझूमध्ये आयोजित वर्ल्ड 'युनिव्हर्सिटी गेम्स'च्या डबल ट्रॅप शूटिंगमध्ये त्यानं कांस्य पदक पटकावलं होतं. नमनवीरच्या मृत्यूच्या बातमीनं पंजाब विद्यापीठासही खेळजगतालाही धक्का बसलाय. नमनवीर सिंह पंजाब विद्यापीठाचा पहिला शूटर ठरला होता ज्यानं २०१३ मध्ये फिनलँडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण दिसून येत असलं तरी अधिक तपास सुरू आहे. याच्या मृत शरीरावर गोळीचे निशाण आढळून आले आहेत. त्यामुळे, नमनवीरनं केली की एखाद्या अनपेक्षित दुर्घटनेमुळे त्यानं आपले प्राण गमावले हे आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. बरारच्या घरात कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना आढळलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कोणत्याही निष्कर्षावर पोहचणं शक्य होऊ शकेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3htZ99A

No comments:

Post a Comment