मुंबई: क्रूझवरील प्रकरणी एनसीबीने केलेली संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट करणार आहेत. ( ) वाचा: बेलार्ड इस्टेट येथील नवीन राष्ट्रवादी भवन येथे आज सकाळी ११ वाजता नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे. 'एनसीबीची आणखी एक पोलखोल' या विषयावर ही पत्रकार परिषद असेल असेल राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे नवा कोणता गोप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणावरील मलिक यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे. एनसीबीने क्रूझवर टाकलेला छापा बोगस होता. क्रूझवरून कोणत्याही प्रकारे ड्रग्ज सापडलेले नाही. ड्रग्ज साठ्याचे फोटो एनसीबी कार्यालयातील आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा याला पद्धतशीरपणे यात गोवण्यात आले आहे. शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते आणि त्यानुसार पुढे संपूर्ण कारवाई केली गेली, असे अनेक दावे नवाब मलिक यांनी याआधी केलेले आहेत. भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला व स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवणारा किरण गोसावी हे दोघे कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांसोबत कसे काय सहभागी झाले होते?, असा गंभीर सवालही मलिक यांनी विचारला होता. वाचा: एनसीबीने क्रूझवरून एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील ३ जणांना नंतर सोडण्यात आले. त्यात भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष यांचा मेहुणा ऋषभ सचदेव याचा समावेश होता. भाजप नेत्यांचे फोन गेल्यानंतर त्याला सोडले गेले, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. यावरून मलिक यांना कंबोज यांनी वकिलांकरवी नोटीसही धाडलेली आहे. दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी मलिक यांनी कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. ७ ऑक्टोबर रोजी ही भेट झाली आणि त्याचे पुरावे मी देणार आहे, असे मलिक म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर मलिक यांची पत्रकार परिषद होत असल्याने मलिक याचा पुरावा म्हणून व्हिडिओ जारी करतील तसेच एनसीबीवर नव्याने आरोप करतील, असे बोलले जात आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p0SHvg
No comments:
Post a Comment