Breaking

Sunday, November 14, 2021

ऑस्ट्रेलियन्स कधीच उधार ठेवत नाहीत, फक्त काही मिनिटांतच केला केन विल्यम्सनचा हिशोब चुकता https://ift.tt/3Dff8RG

दुबई : ऑस्ट्रेलियाचा संघ कधीच कोणाचे उधार ठेवत नाही, तिथल्या तिथेच ते आपाल हिशेब चुकता करतात. हीच गोष्ट आजच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पाहायला मिळाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत विश्वविक्रम रचला होता. पण फक्त काही मिनिटांतच हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने मोडल्याचे पाहायला मिळाले. पाहा नेमकं घडलं तरी काय...ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या संघाला कोंडीत पकडले होते. त्यावेळी विल्यम्सन हा न्यूझीलंडसाठी धावून आला. विल्यम्सनने यावेळी ८५ धावांची खेळी साकारलीच, पण त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम रचला. यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर होता. विल्यम्सनने ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. पण त्यानंतर काही मिनिटांतच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने हा हिशोब चुकता केल्याचे पाहायला मिळाले. कारण मार्शने यावेळी ३१ चेंडूंमध्ये षटकारासह अर्धशतक झळकावले आणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम पुन्हा एकदा आपल्याच नावावर केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मिचेलने २०११ साली पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७५ धावा फटकावल्या होत्या आणि आतापर्यंत त्याच त्याच्या सर्वाधिक धावा होता. पण १० वर्षांनी आजच्या फायनलमध्ये त्याने आपलाच विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात नाबाद ७७ धावा फटकावत तो मॅचविनर तर ठरलाच, पण त्याचबरोबर त्याने आपला विक्रमही मोडीत काढला. वॉर्नर आणि मार्श यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. बोल्टने यावेळी वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३८ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाला असला तरी मार्शने मात्र फटकेबाजी सुरुच ठेवत आपले अर्धशतकही साकारले. मार्शने या सामन्यात ५० चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याचबरोबर अंतिम फेरीत विश्वविक्रम रचण्याची मानही पटकावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FiXhdg

No comments:

Post a Comment