Breaking

Sunday, November 14, 2021

बारा वर्षानंतर हालला पाळणा; मात्र, बाळाला पाहण्यासाठी आईच राहिली नाही https://ift.tt/3wLrwGy

हिंगोली: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात रात्रंदिवस एक करीत शेकडो महिलांची प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा प्रसुती झाल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडलीय. ज्योती गवळी असं या मृत्यू पावलेल्या परिचारिकेचं नाव आहे. (the nurse who done of hundreds of women died tragically after giving birth to a baby) गवळी ह्या २०१८ ऑगस्ट पासून, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात कार्यरत होत्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेकडो महिलांची प्रसूती केली आहे. ज्योती यांना २ नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मुली नंतर तब्बल बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गवळी कुटुंबात पाळणा हालला होता. क्लिक करा आणि वाचा- मात्र, अचानक ज्योती गवळी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले होते. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक निर्णय घेत त्यांच्या नातेवाईकांनी ज्योती गवळी यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवले. तेथे उपचारादरम्यान ज्योती यांचा मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षानंतर घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असता ज्योती गवळी यांचा मृत्यू झाल्याने हा आनंद घटकेचा ठरला आहे. सध्या बाळ सुखरूप असून ज्योती गवळी यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HllFNa

No comments:

Post a Comment