मुंबई : आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलने ८२ चा टप्पा ओलांडला आहे. आज शहरात पेट्रोल प्रती लीटर ८२.१० रुपये झाला आहे. डिझेलच्या दरात वाढ झाली तो डिझेल ७२.०३ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला असून डिझेलसाठी ७३.३९ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ५९ पैसे आणि डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोल ७७.०५ रुपये असून डिझेल ६९.२३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ७८.९९ रुपये असून डिझेल ७१.६४ रुपये आहे. गेल्या सहा दिवसांत पेट्रोल ३.९० रुपयांनी महागले आहे. डिझेलच्या किमती सरासरी ४ रुपये प्रती लीटरने वाढल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवार ७ जूनपासून दररोज इंधन दर आढावा घेण्याची पद्धत सुरु केली. करोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोइयं कंपन्यांनी दररोजचा इंधन आढावा बंद स्थगित केला होता. जागतिक बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव १ टक्क्याने वधारला आणि ३८.९४ डॉलर प्रती बॅरल झाला. तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. मागील दोन महिने कठोर टाळेबंदीने रस्ते वाहतुकीवर निर्बंध होते. यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ४० डॉलरच्या आसपास आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cSSRLf
No comments:
Post a Comment