Breaking

Sunday, June 28, 2020

शेअर बाजार ; करोनाचे वाढते रुग्ण आणि बेजार अर्थव्यवस्था https://ift.tt/2CKFdgR

मुंबई : सरत्या आठवड्यात शुक्रवारी निर्देशांक सावरले होते. आठवड्याचा विचार करता ४३९ अंकांनी वधारला होता. निफ्टीने १३८ अंकांची कमाई केली होती. यादरम्यान निर्देशांकाला नफेखोरीची झळ देखील बसली होती. दरम्यान, मागील आठवड्यात अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव तसेच गलवान खोऱ्यातील भारत आणि चिनी लष्करात झालेल्या तणावाचे पडसाद बाजारावर उमटले होते. निफ्टी शुक्रवारी १०३५० अंकांवर स्थिरावला आहे. मात्र १०५५० च्या स्तरापर्यंत निफ्टीला अडथळा आहे. सध्याचा ट्रेंड पाहता निफ्टी सोमवारी आगेकूच करेल, असा अंदाज सॅमको सिक्युरिटीजचे विश्लेषक जिमित मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, निफ्टीमध्ये जर घसरण झाली तर ९७०० अंकांचा स्तर निर्णायक राहील. एलकेपी शेअर्सचे विश्लेषक रोहित सिंगरे यांच्या मते निफ्टी १०३०० ते १०२०० च्या दरम्यान राहील. मात्र १०००० च्या स्तरावर गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी आहे. वाचा : बाजारात फार्मा कंपन्यांच्या शेअर्सला चांगली मागणी आहे. ग्लेनमार्क फार्मा, सन फार्मा, डाॅ. रेड्डी लॅब या बड्या शेअर्सने चांगली कामगिरी केली आहे. मार्कसन फार्मा, मंगलम ड्रग, हिमाद्री स्पेशालिटी केमिकल आदी शेअर मागील महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आयओबी, रुची सोया, अलोक इंडस्ट्रीज, ओमेक्स, गुजरात गॅस या शेअरला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून आली. तसेच व्होडाफोन आयडिया,भेळ, अशोक लेलँड, युको बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, इंडियन ऑइल कॉर्प या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग झाले होते. करोनाने भारतासह अमेरीकेची आर्थिक स्थिती कमकुवत केली आहे. आर्थिक विकासाला जबर फटका बसणार असल्याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात जोरदार विक्री केली. यामुळे प्रमुख निर्देशांक असलेल्या डाउजोन्समध्ये ७३० अंकांची घसरण झाली. नॅसडॅक आणि एस अँड पी ५०० निर्देशांक अनुक्रमे २.६ टक्के आणि २.४ टक्के घसरले. युरोपातील शेअर बाजारांमध्ये मात्र सकारात्मक वातावरण होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) बुधवारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ४.५ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा अंदाज वर्तवला आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण होणार असल्याचेही नाणेनिधीने नमूद केले आहे. चालू आर्थिक वर्षानंतर २०२१मध्येही देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरणार असल्याचेही संकेत नाणेनिधीने दिले असून, या काळात विकास दर ६ टक्क्यांवर राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चालू आर्थिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विकासदराचा अंदाज उणे ४.९ टक्के इतका वर्तवला होता. कोव्हिड २०१९च्या साथीमुळेच भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत साडेचार टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या मते गेले दोन महिने ७५ टक्के देश लॉकडाउनमध्ये राहिल्यानंतर पुन्हा अर्थचक्र हळूहळू का होईना सुरू झाले आहे. मात्र, अजूनही परिस्थिती सुधारलेली नसल्याने आणखी नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g5norm

No comments:

Post a Comment