Breaking

Tuesday, June 16, 2020

सीमेवर संघर्ष ; आज शेअर बाजारात काय होणार https://ift.tt/2Y92LV9

मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे जवळपास केवळ तीन नाही तर कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाल्याचं आता स्पष्ट झालंय. भारतीय लष्करानं या बातमीला दुजोरा देण्यात आलाय. सोबतच, गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. उंचावरच्या गलवान हाणामारीत १७ गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं. परंतु, उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. तर चीनी सैन्यात जिवीतहानी झाली असली तरी नेमके किती मृत्यू झालेत हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सीमेवरील वाढत्या भू-राजकीय अस्थिरतेमुळे आजच्या सत्रात सीमेवरील तणावाचे पडसाद उमटतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान, काल दुपारी ही घटना समोर आल्यानंतर शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. मात्र दिवसअखेर निफ्टी ९९०० अंकांवर स्थिरावण्यास यशस्वी झाला. गेल्या दोन सत्रात निफ्टीने ९७२० ची पातळी गाठली आहे. बाजारात खरेदीचा ओघ वाढला तर ही पातळी गाठणे निफ्टीला अशक्य नाही, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले. करोनाची दुसरी लाट आल्याचे अंदाज व्यक्त केल्याने सोमवारी जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. आज मात्र निर्देशांकांनी यू टर्न घेतला. फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बॉंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. चीनमधील करोना रुग्णांची संख्या सोमवारच्या तुलनेत आज कमी झाली. यामुळे आशियातील भांडवली बाजाराला दिलासा मिळाला. ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमधील आज तेजीसह बंद झाले. चलन बाजारात काल डॉलरच्या तुलनेत रुपयात १४ पैशांची वाढ झाली. तो डॉलरसमोर ७५.८९ वर ट्रेड करत होता. जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती १४ सेंट्सची घसरण झाली. कच्च्या तेलाचा भाव ३९.५८ डॉलरपर्यंत खाली आहे. भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घटनेनंतर देशभरातील सुरक्षा दलांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्येच पश्चिम कमांडचाही समावेश आहे. मुंबईतील कमांड मुख्यालयाला थेट दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या नसल्या तरी कमांडने स्वत:च्या स्तरावर सज्जतेची तयारी सुरू केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2zDaOjs

No comments:

Post a Comment