मुंबई : भारतीय बाजारांचा विचार केला तर निफ्टीला १०१०० अंकांचा स्तर सहाय्यक आहे. तेजीच्या लाटेत निफ्टीने १०३३८ चा उच्चांक गाठला होता. पुढे तो १०५५० च्या स्तरापर्यंत वाढेल, असा अंदाज सॅमको सिक्युरीटीजचे जिमीत मोदी यांनी सांगितले. अमेरिकेसह काही देशांत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. करोनाची साथ अद्याप थांबलेली नाही. जगभरात सुमारे ८५ लाख नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. करोनाचा वाढता प्रकोप गुंतवणूकदारांची धडकी भरवणारा आहे. यामुळे शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली. डाउ जोन्स २०० अंकांनी घसरला. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे इतर बाजारांवर त्याचे पडसाद उमटतील अशी शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यातील उलथापालथ अखरेच्या दोन सत्रात थांबली. निफ्टीने आता १०३०० च्या स्तराकडे कूच केली असल्याचे शेअरखान ब्रोकिंगचे विश्लेषक गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. शुक्रवारी सेन्सेक्स ५२४ अंकांनी वधारला आणि ३४७३१ अंकांवर पोहचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १५२ अंकांची वाढ झाली. निफ्टी १०२४४ अंकांवर बंद झाला होता. रिलायन्स समूहाने गेल्या दोन महिन्यात जिओ प्लॅटफॉर्मची हिस्सेदारी विक्री करून १. १५ लाख कोटींचा निधी उभारला आहे. त्यामुळे रिलायन्स समूह ३१ मार्च २०२१ पूर्वीच कर्जमुक्त झाला आहे. या वृत्तानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढला असे शेअर दलालांनी सांगितले. त्याशिवाय १५० अब्ज डॉलरचा पल्ला गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज पहिली कंपनी ठरली आहे. बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आयपीओसाठी केंद्र सरकारने निविदा प्रक्रिया सुरु आजपासून सुरु केली आहे. यासाठी दोन सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आज स्थावर मालमत्ता क्षेत्रात जवळपास बहुतांश शेअरमध्ये झाली. ज्यात डीएलएफ, इंडियाबुल्स रियल इस्टेट, गोदरेज प्रॉपर्टीज, फिनिक्स मिल्स, नेस्को, शोभा लिमिटेड, ओबेराय लिमिटेड, प्रेस्टीज इस्टेट आदी शेअर तेजीसह बंद झाले. सोन्यातील तेजीने आज मुथूट फायनान्स या सुर्वण कर्ज देणाऱ्या बिगर फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्के वाढ झाली होती. लडाखमध्ये विश्वासघात करून भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लष्करी आणि कूटनितीसह आर्थिक पातळीवर चीनला उत्तर देण्याची तयारी भारताने सुरू केलीय. चीनकडून आयात होणाऱ्या साहित्याची सविस्तर माहिती सरकारने मागितली आहे. चीनमधून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखणे आणि स्वदेशी उत्पादनाला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करणं आणि आत्मनिर्भर भारताला चालना देण्याच्या उपायांवर पंतप्रधान मोदींनी अलिकडेच बैठक घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.चीनशी सुरू असलेल्या तणावावरून आयात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत सरकार गंभीर आहे. भारताच्या एकूण आयातीपैकी १४ टक्के वाटा हा चीनचा आहे. यात मोबाइल, टेलिकॉम, ऊर्जा, प्लास्टिकची खेळणी आणि क्रिटीकल फार्मा इनग्रीडिएंट्स या क्षेत्रात चीनचा दबदबा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3enCqs4
No comments:
Post a Comment