Breaking

Monday, June 15, 2020

पडझडीचे सावट; भांडवली बाजारात तेजी परतणार? https://ift.tt/30RvkZ3

मुंबई : चीनमध्ये करोनाची दुसरी लाट धडकल्याच्या वृताने भांडवली बाजारात एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यात करोनाचे समूळ उच्चाटन होण्याआधीच दुसरी लाट धडकल्याने गुंतवणूकदारांमधील चिंता वाढली आहे. परिणामी सोमवारी बाजारांत मोठी घसरण पहायला मिळाली. हा दबाव आणखी एक दोन सत्रे सुरु राहील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. निफ्टी ९७०० च्या पातळीवर ट्रेड करेल. बाजारात आणखी घसरण झाली तर निफ्टी ९५४४ च्या नीचांकी स्तरावर सुद्धा येईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्याची नकारात्मक स्थिती आणखी एक ते दोन सत्रे सुरु राहील. त्यामुळे निर्देशांक पुन्हा मोठी उभारी घेईल अशी शक्यता कमी आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले की निफ्टीला ९७०० च्या स्तरावर पोषक वातावरण आहे. दरम्यान, अमेरिकन शेअर बाजारातदेखील सोमवारी मोठी घसरण झालाय. एस अँड पी ५०० इंडेस्क तब्बल ३००० अंकांनी कोसळला. चीनमधील करोना विषाणूची दुसरी लाट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबर झटका देणारी आहे. यामुळे नजीकच्या काळात तेथील परिस्थिती आणखी चिघळेल, असे अंदाज व्यक्त होत आहे. त्याशिवाय डाऊजोन्समध्ये ५०० हुन अधिक अंकांची घसरण झाली. नॅसडॅक इंडेक्स १३२ अंकांनी घसरला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ५५२.०९ अंकांनी घसरून ३३,२२९.८०च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १५९.२० अंकांनी घसरून ९.८१३.७० अंकांवर स्थिरावला. सोमवारी सत्रांतर्गत व्यवहारांत सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांची समभाग कोसळले. केवळ चार कंपन्यांचे समभाग वरच्या पातळीवर बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टीमधील ४२ कंपन्यांचे समभाग कोसळले, तर आठ कंपन्यांचे समभाग वरच्या पातळीवर बंद झाले. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील ३८ टक्के नवोद्योगांकडे (स्टार्टअप्स) पैसा शिल्लक राहिलेला नाही, तर ३० टक्के नवोद्योगांकडे पुढील एक ते तीन महिने तग धरता येईल इतकाच पैसा उरलेला आहे. लॉकडाउनचा हा अतिशय गंभीर परिणाम मानला जात आहे. लोकलसर्कल्स या संस्थेने वरील सर्वेक्षण केले आहे. एकंदर करोना साथीचा परिणाम आणि त्याहीपेक्षा या साथीचा वेग कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉडाउनचा परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले. यासाठी एकूण २८ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वजण ८,४०० उद्योजक, एसएमई, नवोद्योगांमधील होते. या प्रतिसादकर्त्यांपैकी १६ टक्के लोकांनी त्यांच्याजवळ पुढचे तीन ते सहा महिने पुरेल इतकाच पैसा असल्याचे सांगितले आहे. अन्य १२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी तर पुढील एकच महिना पुरेल इतकीच रोकड शिल्लक राहिल्याचे सांगितले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UMQpzE

No comments:

Post a Comment