मुंबई : सध्या परकीय गुंतवणूकदारांपुढं भारत-चीन तणाव आणि जागतिक बाजारातील घडामोडी महत्वाच्या आहेत. करोनाचा कहर सुरूच आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार स्टॉकची निवड सावधगिरीने करतील, असे रेलिगेअर ब्रोकिंगचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांच्या मते गुरुवारी निफ्टी १००४६ अंकांवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या तो १०१४९ ते १०१७८ अंकांच्या दरम्यान पुढे जाईल. जर बाजारात घसरण झाली तर निफ्टी ९९४३ ते १००४६ च्या दरम्यान राहील, असे त्यांनी सांगितले. कालच्या तेजीने निफ्टीने बाजारात सकरात्मक वातावरण तयार केले आहे. आगामी काही दिवस हा ट्रेंड कायम राहू शकतो म्हणून शेअर गुंतवणूकदारांना योग्य ती निवड करावी, असा सल्ला चॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांनी दिला. सध्याच्या स्तरावर निर्देशांकाला ९९०० ते १०१७० वर पोषक वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. काल बाजारात सकाळपासून खरेदीचा ओघ होता. ऑटो, पर्यटन, ऊर्जा, बँक आदी क्षेत्रातील महत्वाच्या शेअरची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. चलन बाजारात डॉलरसमोर रुपया सावरला होता. कालच्या सत्रात मुथूट फायनान्स, कोल इंडिया, वेदांता, रुची सोया, अदानी ग्रीन एनर्जी, बजाज फिन सर्व्ह, बजाज फायनान्स, महिंद्रा हॉटेल्स, इंडियन हॉटेल्स, गोदरेज प्रॉपर्टीज, सनटेक रियल्टी, भारती इन्फ्रा, टाटा कम्युनिकेशन आदी शेअर तेजीत आहेत. सध्या ७०० अंकांच्या वाढीसह ३४२०८ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी २१० अंकांच्या वाढीसह १००९१ अंकांवर बंद झाला. कालच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान दीड लाख कोटींची भर पडली. गलवानमध्ये विश्वासघात करून भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या चीनाल आर्थिक स्तरावर घेरण्याचा प्रयत्न भारताने सुरू केला आहे. चिनी वस्तुंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याच्या योजनेवर सरकारेच काम सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला या पुढे कुठल्याही स्थितीत सहजतेने न घेण्याची खून गाठ धोरणकर्त्यांनी बांधली आहे. चीनविरोधात कठोर धोरण राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारतात होणाऱ्या आयातीपैकी १४ टक्के आयात ही चीनमधून केली जाते. यात मोबाइल, टेलिकॉम, ऊर्जा, प्लास्टिक खेळणी आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा समावेश आहे. चीनच्या निकृष्ट दर्जाच्या मालाच्या आयातीवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. तांत्रिक नियम, सुरक्षा आणि गुणवत्तेच्या निकषांचे कठोर पालन आता चिनी मालासाठी केले जाईल. सरकारकडे ३७० वस्तुंची यादी आहे. जीवनावश्यक नसलेल्या अशा या वस्तुंची आयात मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30Ux1oj
No comments:
Post a Comment