मुंबई : सलग तिसऱ्या आठवड्यात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मंगळवारी सलग १७ व्या दिवशी इंधन दरवाढ होऊन मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर १८ पैशांनी तर डिझेल ५२ पैशांनी महागले आहे. आज पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपये झाला आहे. तर डिझेल ७७.७६ रुपये झाला आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल ८६.३६ रुपये तर डिझेल ७७.२४ रुपये होते. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपये झाला. त्यात २० पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल ८१.४५ रुपये झाले आहे. तर चेन्नईत पेट्रोलने ८३.०४ रुपयांचा स्तर गाठला आहे. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.४० रुपये झाला. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७४.६३ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७६.७७ रुपयांचा स्तर गाठला आहे. आज चेन्नईत डिझेल ४७ पैशांनी महागले आहे. करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे. प्रचंड करांमुळे किमती आवाक्याबाहेर देशभरात ही दरवाढ झाली असून प्रत्येक राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार (व्हॅट) दोन्ही इंधनांचे दर बदलते राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या किरकोळ दरामध्ये करांचा वाटा एकूण दराच्या दोन तृतीयांश असतो. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/383SKMp
No comments:
Post a Comment