मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री यांच्यासह ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. यात धनंजय मुंडेंसह पाच जण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही करोनाची लक्षणं दिसून आली नव्हती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये करोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते करोनामुक्त झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची बाधा झाली होती. तेही करोनामुक्त झाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Atnyth
No comments:
Post a Comment