मुंबई : सोमवारी दिवसअखेर १७९ अंकांनी वधारला आणि ३४९११ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ६६.८० अंकांनी वधारून १०३११ अंकांवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रात दोन्ही इंडेक्स वधारले. निफ्टीला १०२५० च्या स्तरावर पोषक वातावरण असून तो १०१६० च्या स्तरापर्यंत खाली येईल. तर काहींच्या मते निफ्टी १०४०० ते १०५०० च्या दरम्यान राहील. मागील तीन दिवसात झालेल्या तेजीने वधारलेल्या शेअरमध्ये आज नफावसुली होईल,अशी शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक दीपक जसानी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की वरच्या पातळीवर निफ्टी १०३९४ ते १०४५८ च्या दरम्यान वाढेल. तर खाली तो १०१६७ ते १०२४४ अंकांच्या दरम्यान राहील. अमेरिकेतील भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण असल्याने त्याचे पडसाद स्थानिक बाजारावर उमटतील. आज बँक निफ्टीची दमदार कामगिरी निफ्टीची पुढील दिशा ठरवेल, असे सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेसह जवळपास ८१ देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यातच लडाखमधील सीमेवर भारत आणि चीनमधील निर्माण झालेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी दिला. सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात करोनाची दुसरी लाट धडकण्याचा अंदाज वर्तवल्याने अमेरिकेन गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रीचा सपाटा लावला. युरोपातील भांडवली बाजारात सोमवारी संमिश्र वातावरण होते. आज बाजारात फार्मा कंपन्या, मेटल, बँका आणि वित्त संस्था या क्षेत्रातील शेअर्सला मागणी असेल. करोनावर जेनेरिक औषधला मान्यता मिळाल्यानंतर बाजारात औषध निर्मितीतील कंपन्यांच्या शेअरची मोठी खरेदी झाली. तोच ट्रेंड आज सुद्धा दिसण्याची शक्यता ब्रोकर्स व्यक्त करत आहेत. आज ग्लेनमार्क फार्मा, सुवेन फार्मा, सन फार्मा, एफडीसी, लाॅरस लॅब या शेअरनी वर्षभराचा उचांक गाठला होता. कोव्हीड-१९ उपचारांसाठी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायतशीर दरात औषध उपलब्ध व्हावे यासाठी गीलिड सायन्स इन्क. सोबतच्या परवाना करारातून हेटेरोने ‘कोविफॉर’(रेमडेसिविर) हे जेनेरिक औषध सादर केले आहे. त्याशिवाय सिप्ला कंपनीलादेखीत या औषधाच्या निर्मितीची परवानगी देण्यात आली आहे. या दोन कंपन्यांना परवानगी मिळाल्याने बाजारात रेमडेसिविर औषधाचा पुरवठा वाढणार असून करोनाची साथ आटोक्याल आणण्यास मदत होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fSX9Ex
No comments:
Post a Comment