Breaking

Saturday, July 25, 2020

फडणवीसांना अमित शहा हे आदेश बांदेकरांसारखे वाटले असतील: cm ठाकरे https://ift.tt/2ZYxm8z

मुंबई: विरोधी पक्षनेते साखरेच्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले. साखर घरातच लागत असल्याने ते गृहमंत्र्यांना भेटले असावेत. आदेश बांदेकर होम मिनिस्टरचा कार्यक्रम करतात. फडणवीसांनाही गृहमंत्री तसेच वाटले असावेत म्हणून शहांना ते भेटले असावेत, अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी शहा-फडणवीस भेटीची खिल्ली उडवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साखरेच्या प्रश्नावर शहा यांची भेट घेतल्याचं मीडियाला सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टीका केली. फडणवीस यांना संपूर्ण देशाच्या साखर कारखानदारीची चिंता सतावत असेल. त्यामुळेच शहांना ते भेटले असावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पण शहांकडे गृहखाते आहे. त्याचा आणि साखरेच्या प्रश्नाचा संबंध काय? असा सवाल नेते यांनी उद्धव ठाकरेंना केला. त्यावर साखर घरातच लागते ना. गृहात. त्यामुळे फडणवीस तिकडे गेले असावेत. त्यांना गृहखातं... गृहमंत्री हे आदेश बांदेकरांसारखे वाटले असावेत. बांदेकर कार्यक्रम करतात... होम मिनिस्टर... त्यांना वाटलं गृहमंत्रीही होम मिनिस्टर आहे... साखर घरात लागते... म्हणून गेले असतील त्यांच्याकडे साखरेचा प्रश्न घेऊन, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. पण साखरेचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांकडे येतो ना? असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर माहीत नाही. मला त्याची कल्पना नाही. त्यावर तेच सांगू शकतील, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी सरकार पाडण्याच्या सुरू असलेल्या चर्चेवरही मतं मांडली. काही लोक म्हणतात ऑगस्टमध्ये सरकार पडेल. काही लोक सप्टेंबरमध्ये सरकार पडणार असल्याचं सांगत आहेत. त्यांचा इरादा असेल नसेल माहीत नाही. मी इथे बसलेलोच आहे. माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा. पाडायचं तर जरूर पाडा. त्यांना पाडापाडी करण्यातच आनंद वाटतो. काही लोकांना घडवण्यात आनंद वाटत असतो. तर काही लोकांना बिघडवण्यात आनंद वाटत असतो. त्यामुळे जरूर सरकार पाडा. हे माझं आव्हान नाही. हा माझा स्वभाव आहे. या सरकारचं भविष्य विरोधी पक्षावर अवलंबून नाही. त्यामुळे त्यांना सरकार पाडायचं तर जरूर पाडावं, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं. महाराष्ट्रातलं सरकार लोकशाही विरोधी आहे, असं ते सांगतात. मग सरकार पाडणं लोकशाही आहे का? फोडाफोडी करून सरकार आणणं ही त्यांची लोकशाही आहे. या असल्या लोकशाहीलाच शिवसेना प्रमुखांचा विरोध होता, असं सांगतानाच राज्यात ऑपरेशन लोटस होणार की नाही, हे मला माहीत नाही. ऑपरेशन लोटस करायचं तर करा. मी कशाला भाकीत करू, असंही ते म्हणाले. पालखीचे भोईच व्हायचयं ना? मग तिकडे का जाता? यावेळी त्यांनी आयारामगयारामांवरही टीका केली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेला कोणताही नेता सर्वोच्च पदी गेल्याचं तुम्ही कधी पाह्यलं का? पक्षांतर करणाऱ्यांना दुसऱ्या पक्षात कधीच अशी मोठी संधी मिळत नाही. उलट अशा फुटीर नेत्याचा वापरा आणि फेका असाच वापर केला जातो. कोणतंही उदाहरण तुम्ही पाहा. खरं तर पक्षांतर करणाऱ्यांसाठी हा संदेश आहे. तुमच्या पक्षात एखाद्या नेत्याने अन्याय केला म्हणून पक्षांतर करणं हा त्यावरचा पर्याय नाही. तुम्ही त्या पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात जाता. त्या पक्षाची पालखी वाहता ते योग्या आहे का? शेवटी तिथेही पालखीच वाहणार ना? दुसऱ्याच्या पालखीत बसायला मिळत असेल तर जरूर जा. मी तुमच्या आड येणार नाही. पण पालखीचे भोईच व्हायचे असेल तर कशाला जाता?, असा सवाल करतानाच पक्षांतर करणारे किती नेते मोठे झाले. शेवटी कालांतराने पक्षांतर करून आलेल्यांची ठरावीक काळाने कारकिर्दही संपवली जाते, असं कटू सत्यही त्यांनी सांगितलं. म्हणून आघाडीसोबत गेलो... यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. मी महाविकास आघाडीसोबत आलो. त्याला कारण आहे. ज्यांच्यासोबत ज्या उद्देशाने गेलो होतो, त्यांच्या उद्देशातच पोकळपणा असल्याचं मला दिसून आलं. त्यामुळे मी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट करतानाच मुख्यमंत्री होणं हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. माझ्या स्वप्नातही नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jBqm9L

No comments:

Post a Comment