Breaking

Monday, July 20, 2020

सत्ताधारी आघाडीतील मित्र पक्ष आक्रमक; हजारो लिटर दूध रस्त्यांवर https://ift.tt/2CSxTQq

म. टा. प्रतिनिधी । सांगली शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले. राज्यात गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असल्याने सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. देशांतर्गत दूध दर नियंत्रित राहण्यासाठी दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानीचे आंदोलन होण्यापूर्वीच सोमवारी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलन करून दूध दराचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मॅच फिक्सिंग प्रमाणे असल्याचा आरोपही केला. यानंतर आक्रमक बनलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटे पासूनच आंदोलनाला सुरुवात केली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर येलूर फाटा येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर अडवून त्यातील २५ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतले. संघटनेचे प्रमुख यांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील आंदोलनात सहभाग घेऊन गोकुळ दूध संघाचे दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. वाचा: स्वाभिमानीने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच सुरू केले. शेतकऱ्यांनी गावांमध्ये मंदिरात दुग्धाभिषेक केला, तर काही ठिकाणी मोफत दूध वाटप देखील सुरू आहे. या आंदोलनात गोकुळ दूध संघाची वाहने लक्ष्य केल्याचे दिसत आहे. गोकुळ दूध संघाने सुरुवातीला स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी सकाळचे दूध संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुग्ध विभागाची नोटीस येतात संघाला हा निर्णय बदलावा लागला. गोकुळ दूध संघाने यू-टर्न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संघाची वाहने लक्ष्य केली जात आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32DiZs1

No comments:

Post a Comment