पालघर: जिल्ह्यात मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ एवढी होती. मध्यरात्री लोक गाढ झोपेत असताना अचानक जमीन हलल्याने स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरलेल्या पालघरकरांनी अख्खी रात्र जागून काढली. पालघरमध्ये सातत्याने रात्री-अपरात्री भूकंपाचे झटके बसत असल्याने स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आज मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी पालघर जिल्ह्यात भूकंपाचे झटके जाणवले. घरातील भांडे अचानक हलू लागल्याने आणि काही भांडे पडल्याने स्थानिक लोक सतर्क झाले आणि त्यांनी तात्काळ घराच्याबाहेर पळ काढला. त्यानंतर स्थानिकांनी पुन्हा भूकंपाचे झटके जाणवण्याच्या भीतीने संपूर्ण रात्र जागून काढली. आठवड्यातून दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. २४ जुलै रोजी देशातील पाच राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. केवळ १२ तासांच्या आतचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याच दिवशी पालघरही मध्यरात्री भूकंपाने हादरून गेले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३. १ एवढी नोंदवली गेली होती. भूकंपाचं केंद्र जमिनीत ५ किलोमीटर आत होतं. त्याच दिवशी म्हणजे २४ जुलै रोजी जम्मू-काश्मीरही भूकंपाने हादरून गेले होते. जम्मू-काश्मीरमध्ये पहाटे ५ वाजून ११ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ होती. तर उत्तर प्रदेशातील अलीगड येथे सकाळी ६ वाजून २ मिनिटाने भूकंपाचे झटके जाणवले होते. बागपत येथेही भूकंपाचे झटके जाणवले. त्याची तीव्रता ३.० इतकी नोंदवली गेली. आसामच्या तेजपूर येथे २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले होते. या भूकंपाचं केंद्र तेजपूरपासून ५८ किलोमीटर दक्षिण पूर्वेला जमिनीखाली २५ फूट खाली होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ एवढी नोंदवण्यात आली. त्याच दिवशी मिझोरामही भूकंपाने हादरले. चम्फाईपासून २९ किलोमीटर दूर जमिनीखाली १० किलोमीटर आत या भूकंपाचे केंद्र होतं. ११ वाजून १६ मिनिटाने जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ इतकी होती. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात भूकंपाचे झटके जाणवत आहेत. दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, मणिपूर, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी भागात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2EkCefV
No comments:
Post a Comment