Breaking

Monday, July 27, 2020

...तर लॉकडाऊन तोडणार; जेलमध्ये जाऊन राहण्याचीही तयारी; आंबेडकरांचा इशारा https://ift.tt/3f5JitF

अकोला: तुम्हाला वाढवायचा असेल तर जरूर वाढवा. पण जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही लॉकडाऊन मोडू, असा इशारा देतानाच आम्हाला गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवू नका, माझी तुरुंगात जाऊन राहण्याची तयारी आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी दिला. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. राज्यात यापुढे लॉकडाऊनमध्ये वाढ करू नका, नागरिक करोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही सांगितले. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे, असं सांगितलं जातं. नॉन मॅट्रिक्युलेट माणसाने ही धोक्याची घंटा वाजवली आहे. करोनाची दक्षता घेण्याची गरज आहे. खरे तर ज्यांचा ज्यांचा जनतेशी थेट संपर्क येतो त्यांची करोना टेस्ट करावी. ज्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न होईल, त्यांना क्वॉरंटाइन करावं आणि ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांनी बाहेर फिरण्यास परवानगी द्यावी, असं आंबेडकर म्हणाले. तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर करा. पण आम्ही लोकांना लॉकडाऊन मोडायला सांगणार. लॉकडाऊन मोडल्यानंतर त्याची कशापद्धतीने अंमलबजावणी करायची हे आमचं आम्ही ठरवू. दानदात्यांची दान देण्याची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवायचा असेल तर तुम्हाला आधी आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर आम्हाला लॉकडाऊन मोडावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी करोनाच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले. करोनाचे रोज आकडे येत आहेत. या आकड्यांबाबत मी आधीही शाशंक होतो, आजही आहे. आकडेवारीनुसार करोनाचा मृत्यूदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर बरे होण्याचं प्रमाण सरासरी ६६ टक्के आहे. मला हे गणितच समजलेलं नाही. हजारांमागे ३ मृत्यू होत असेल तर बरे होण्याचा दर ६६ कसा? जो मेला नाही, तो जगला असं मी समजतो. मग रुग्ण जीवंत राहिला असेल तर बरे होण्याचा रेट ९० टक्क्याच्या आसपास पाहिजे, तो ६६ टक्के कसा? असा सवाल करत ही आकडेवारीच एक गौडबंगाल असल्याचा दावाही त्यांनी केला. वर्तमानपत्रातून करोनाचं आशादायक चित्रं निर्माण केलं जात असून वृत्तवाहिन्यातून भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Eq9NNQ

No comments:

Post a Comment