मुंबई : वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणा झाल्याने भांडवली बाजार सोमवारी तेजीसह बंद झाले. हाच ट्रेंड आज मंगळवारी देखील सुरूच राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. बाजार उघडला त्यावेळी सेन्सेक्स १८५ अंक वर होता. त्यानंतर त्याने अचानक ३८६ अंकांची उसळी घेतली. मात्र बाजार बंद होताना तो १७३.४४ अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स ठरवणाऱ्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी, बजाज ऑटो, टेक महिंद्र, ओएनजीसी आणि मारुती या कंपन्यांना फायदा झाला. या कंपन्यांचे समभाग ७.९२ टक्क्यांपर्यंत वर गेले. त्याचवेळी स्टेट बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे समभाग तोट्यात गेले. जपान वगळता अन्य आशियाई भांडवल बाजारही सोमवारी वधारले. जपानचा जीडीपी ७.८ टक्के आक्रसल्यानंतर निक्केई निर्देशांक मोठ्या प्रमाणावर पडला. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेन्ट खनिज तेल ०.४० टक्के वाढून प्रति बॅरल ४५.१३ डॉलर या किंमतीवर गेले. फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. युरोपीय आणि आशियाई बाजारात कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि भू-राजकीय मुद्द्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे संमिश्र ट्रेंड दिसून आला. नॅसडॅकमध्ये ०.२१ टक्के, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.३० टक्क्याची घसरण दिसून आली. तर निक्केई २२५ मध्ये ०.८३ टक्क्याची घट दिसून आली. दुसरीकडे एफटीएसई १०० च्या शेअर्समध्ये ०.५७ टक्के आणि हँगसेंगमध्ये ०.६५ टक्क्याची वृद्धी झाली. वाचा : महत्वाच्या शेअरची कामगिरी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड: कंपनीच्या शेअर्समध्ये २.०७ टक्क्याची वृद्धी झाली आणि शेअर ३,८७९.९५ रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी कंपनीने प्रति शेअर ८३ रुपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड: कंपनीच्या स्टॉकमध्ये ०.०६ टक्क्याची वृद्धी झाली व ग्लोबल रिसर्च फर्म सीएलएसएने स्टॉकवर खरेदी कायम ठेवल्यानंतर त्यांनी ४२४.४० रुपयांवर ट्रेड केला. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न सकारात्मक झाले. त्यानंतर सबक्रिप्शन रिव्हेन्यूमध्ये १८% टक्क्याची वाढ दिसून आली. एनटीपीसी लिमिटेड: कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ७.४७ टक्क्याची वृद्धी झाली आणि कंपनीची जूनमधील कमाई शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त झाली. परिणामी शेअर ९५ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या नफ्यात ६ टक्क्याची घट झाली तर ऑपरेशन्समधील महसुलात २.५७ टक्क्याची घसरण झाली. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड: कंपनीने नफ्यात दुप्पट वृद्धीची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.४८ टक्क्याची वाढ झाली शेअर ४८२.७५ रुपयांवर बंद झाला. २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५४.०४ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा एकत्रित महसूल २,३४४.७८ कोटी रुपये झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: आरआयएलच्या शेअर्समध्ये ०.९३% टक्क्याची घसरण नोंदवली गेली व त्यांनी २०९४.०५ रुपयांवर ट्रेड केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठी (तत्काळ अॅग्रीमेंट) च्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g44Xmj
No comments:
Post a Comment