मुंबई : आशियातील सकारात्मक संकेतांनी मंगळवारी शेअर निर्देशांकाने चांगली सुरुवात केली होती. सेन्सेक्सने शतकी झेप घेतली तर निफ्टीने ११५०० चा पल्ला गाठला होता. मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दिवसअखेर दोन्ही निर्देशांक किरकोळ वृद्धीसह बंद झाले. निफ्टी ५.८० अंकांनी वधारला व ११,४७२.२५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ४४.८८ अंकांची वृद्धी घेतली व तो ३८८४३.८८ अंकांवर बंद झाला. निफ्टीने ११३५० चा स्तर राखला आहे. निफ्टीसाठी ११५०० चा महत्वाचा टप्पा आहे. आज खरेदीचा ओघ वाढला तर निफ्टी तो टप्पा सहज गाठेल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तपारिया यांनी व्यक्त केला. तर स्थानिक पातळीवर फारसे उत्साहवर्धक वातावरण नही. त्यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावध रहावे, असा सल्ला जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी दिला. बँकिंग आणि ऑटो सेक्टर वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत फार वाढ झाली नाही. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.५१ टक्के आणि ०.११ टक्क्यांची वृद्धी झाली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. मंगळवारी टाटा मोटर्स (५.३२ टक्के ), बजाज फायनान्स (४.७५ टक्के), एसबीआय (३.३८ टक्के), टेक महिंद्रा (२.२८ टक्के) आणि आयशर मोटर्स (२.१८ टक्के) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर गेल (१.१७ टक्के), एनटीपीसी (१.५२ टक्के), सन फार्मा (१.४० टक्के), टाटा स्टील (१.२९ टक्के) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (१.१७ टक्के) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील चढ-उतारामुळे भारतीय रुपया आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत फ्लॅट म्हणजेच ७४.८३ रुपयांवर स्थिरावला.जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. हँगसेंग निर्देशांकात ०.२६ टक्क्याची घसरण झाली. युरोपियन आणि आशियाई निर्देशांकांनी आज सकारात्मक व्यापार दर्शवला. करोना विषाणूच्या लसीच्या विकासातील प्रगतीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नॅसडॅकने ०.६० टक्के, निक्केई २२५ ने १.३५ टक्के, एफटीएसई १०० ने ०.२४ टक्के आणि एफटीएसई एमआयबीने ०.९३ टक्क्याची वृद्धी नोंदवली. वाचा : टाटा मोटर्स: टाटा मोटर्सचे शेअर्स ५.३२ टक्के वधारले व १२७.६५ रुपयांवर बंद झाला. पुढील तीन वर्षात कंपनीने शून्य कर्ज स्थिती मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले. कंपनीचे निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्ज ४८,००० कोटी रुपये आहे. प्रॉक्टर अँड गँबल हायजिन अँड हेल्थ केअर: २०२० या वित्तीय वर्षात चौथ्या तिमाहितील नफा १३.८ टक्क्यांनी वाढून ६९.२ कोटी रुपये झाला. कंपनीचा महसूल ६३४.५ कोटी रुपयांनी घसरला. परिणामी कंपनीचा शेअर १.३६ टक्क्यांनी वधारला व १३०.६० रुपयांवर बंद झाला. अलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड: कंपनीचे दोन्ही प्रमोटर्स कंपनीचे इक्विटी शेअर्स दोन्ही एक्सचेंजमधून काढून घेण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती कंपनीने एक्सचेंजला दिली. परिणामी कंपनीचे शेअर १९.९८ टक्क्यांनी वाढला व १३०.६० रुपयांवर बंद झाला. एलआयसी हाऊसिंग फायनान्स: एलआयसी हौसिंग फायनान्स कंपनीने ८.०८ टक्क्यांची वृद्धी घेतली व शेअर्सनी २९८.९५ रुपयांवर बंद झाला. २०२१ या वित्त वर्षातील जून महिन्याच्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३४ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा निव्वळ नफा ८१७.४८ कोटी रुपये झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2D2u8Ze
No comments:
Post a Comment