नवी दिल्ली : देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं यांनी आज पुन्हा एकदा संबोधित केलं. राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदींनी देशाला अभिवादन केलं. यानंतर देशाला संबोधित करताना आपल्या जवळपास तासभर भाषणात त्यांनी अनेक विषयांना हात घातला. महत्त्वाचं म्हणजे, महत्त्वकांक्षी आणि लोकोपयोगी अशा '' योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केली. 'आजपासून देशात एक मोठ्या अभियानाला सुरुवात होतेय. हे मिशन आहे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' असं म्हणतानाच 'भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घेऊन येईल' असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. सोबतचं, 'तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजर, कोणत्या डॉक्टरांनी आपल्याला कोणतं औषध दिलं, केव्हा दिलं, रिपोर्टस् काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये असतील' अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी याबद्दल दिली. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : काय आहे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन - 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'द्वारे देशभरातील डॉक्टरांच्या सगळी माहितीसोबतच देशभरातील सगळ्या आरोग्य सेवांची माहिती एका वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. - हे अॅप डाऊनलोड करून नागरिकांना स्वत:ला त्यावर रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक 'हेल्थ आयडी' अर्थात ओळख क्रमांक प्रदान केला जाईल - यामुळे प्रत्येक नागरिकावर केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट आणि टेस्टची संपूर्ण माहिती एका क्लिकवर डिजिटल पद्धतीनं उपलब्ध राहील आणि महत्त्वाचं म्हणजे याचा एक रेकॉर्ड ठेवला जाईल - त्यामुळे, तुम्ही कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जाल त्यावेळी तुम्हाला सगळी कागदपत्रं आणि टेस्ट रिपोर्ट घेऊन जाण्याची आवश्यकता उरणार नाही. तुमची 'मेडिकल हिस्ट्री' तुमच्या 'हेल्थ आयडी'वर उपलब्ध असेल. - डॉक्टर कुठेही बसून तुमच्या हेल्थ आयडीद्वारे तुमचा सगळा मेडिकल रेकॉर्ड पाहू शकतील. - या अॅपवर रजिस्ट्रेशन करणं पूर्णत: ऐच्छिक पद्धतीनं असेल. आज लाल किल्ल्यावरून 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची माहिती देतानाच पंतप्रधान मोदी यांनी करोना लशीसंदर्भातही महत्त्वाचं वक्तव्य केलं. 'आज भारतात करोनावर एक नाही, दोन नाही तर तीन लशींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांकडून जेव्हा हिरवा कंदिल मिळेल, तेव्हा या लशीचं उत्पादन मोठ्या संख्येत करण्यावर देशाचा भर असेल. देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आलाय' असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. इतर बातम्या : वाचा : वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kLp8sX
No comments:
Post a Comment