Breaking

Saturday, August 15, 2020

मस्तच! मुंबईत केवळ ५.८ टक्के लोकांचीच अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह! https://ift.tt/3kT8Ka2

मुंबई: मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत केवळ ५.८ टक्के लोकांची पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य विभागाने मुंबईत एकूण ५६ हजार ८२५ लोकांची अँटिजेन टेस्ट केली होती. त्यातील फक्त ३ हजार ३५० लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरात सुमारे ५० हजार ४६२ लोकांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ५३१ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. उपनगरात ६ हजार ३९० लोकांना करोना झाला होता. त्यापैकी ८१९ लोकांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. साधारणपे करोना टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी २४ तास लागतात. त्यामुळे कमी वेळात संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी सरकारने अँटिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यात या टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 6 लाख ७५ हजार ३५ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी ८२ हजार ८६८ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात १ लाख २४ हजार ५३३ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून त्यात २८ हजार ४४७ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. ठाण्यात ६७ हजार १८९ लोकांची टेस्ट करण्यात आली असून ९ हजार ९२९ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नाशिकमध्ये ४५ हजार ३९९ लोकांची टेस्ट करण्यात आली असून ४ हजार ३१४ लोक पॉझिटिव्ह निघाले आहेत. करोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर डोअर टू डोअर सर्व्हे केला. त्यानुसार घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली. यात ३०१३ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ९५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी दिसून आली. त्यामुळे त्यांना तात्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ६० लाख ४० हजार १५९ लोकांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे. त्यात ८ लाख ३ हजार ८५५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यात ८० हजार ८४२ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य असल्याचं दिसून आलं तर ३०१३ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ९५ टक्के ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचं दिसून आलं. या रुग्णांना तात्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यांचा मधुमेह, रक्तदाब आणि दमा आदींची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करूनच त्यांना घरी सोडण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h1KOyN

No comments:

Post a Comment