Breaking

Friday, August 7, 2020

केरळ विमान अपघात LIVE : १८ मृत्यू, उड्डाण मंत्री कोझिकोडकडे रवाना https://ift.tt/2XF4OiR

नवी दिल्ली : दुबईहून केरळला दाखल होणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलटसह १७ जणांचा मृत्यू झाला. '' अंतर्गत एअर इंडियाचं विमान दुबईहून भारतीय प्रवाशांना घेऊन येत असताना हा अपघात घडलाय. रनवेवरून घसरल्यानंतर विमान दरीत कोसळलं. या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९० जण होते. (अपडेट पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा) वाचा : वाचा : वाचा : Live अपडेट : - शनिवारी सकाळी अपघातस्थळी असं चित्रं दिसत होतं - केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजय आज कोझिकोडचा दौरा करणार आहेत - 'वंदे भारत मिशन' अंतर्गत विमान १९० प्रवाशांना दबईहून घेऊन परतत होतं. पायलटनं टेबलटॉप एअरपोर्ट रनवेच्या शेवटपर्यंत विमान थांबवण्याचा प्रयत्न केलं. परंतु, पावसामुळे विमान रनवेवरून घसरलं असावं : उड्डाण मंत्री - दोन पायलटसहीत १८ जणांचा मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना आहे. १२७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतर किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय : हरदीप सिंह पुरी, नागरी उड्डाण मंत्री - अपघातात झालेला एक मृत्यूदेखील दु:खद असतो. सुदैवानं अपघातग्रस्त विमानाला आग लागली नाही. चौकशीसाठी दोन टीम्स रवाना झाल्या आहे. मीदेखील तिथे पोहचतोय : हरदीप सिंह पुरी, नागरी उड्डाण मंत्री - परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण कोझिकोडला दाखल झालेत. - विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ११० जणांना कोझीकोडमधील हॉस्पिटलमध्ये आणि ८० जणांना मलप्पूरममधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे - या अपघातात ४ केबिन क्रू मेबर्सं वाचलेत - शुक्रवारी रात्री उस रेस्क्यू मिशन पूर्ण करण्यात आलं. अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3km4ak5

No comments:

Post a Comment