Breaking

Tuesday, September 29, 2020

हाथरस: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; राजकारण तापले https://ift.tt/2GjfxtC

लखनऊ: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात प्रकरणातील ( Case) पीडितेच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला. मात्र, गावकरी आणि पीडिती कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेच्या मृतदेहावर केले. हे अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या परवानगीनेच झाल्याचे पोलिस अधिकारी सांगत असले तरी देखील अंत्यसंस्कारावेळी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओवरून वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे स्पष्ट होत आहे. यात पोलिसांनी बळजबरीने पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेश पोलिसांचा हे कृत्य भ्याडपणाचे असल्याचे म्हटले आहे. निर्दयतेची ही परिसीमा आहे, ज्या वेळी सरकारने संवेदनशील व्हायला हवे होते, त्या वेळी सरकारने निर्दयतेच्या मर्यादा ओलांडल्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. आम आदमी पक्षाने देखील अंत्यसंस्काराचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला आहे. आता या प्रकरणावर राजकारण तापू लागले असून सोशल मीडियावर लोक देखील आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातच या पीडितेवर उपचार सुरू होते. त्या रुग्णालयाबाहेरही लोकांनी निदर्शने केली. तसेच लोकांनी मेणबत्ती मोर्चा देखील काढला. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणीही आता होऊ लागली आहे. काँग्रेस पक्षाने तर पंतप्रधानांच्या या प्रकरणावरील मौनावरही प्रश्न उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशात एका विशिष्ट वर्गाचे जंगलराज असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, भीम आर्मीसारख्या अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा- मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीपासून ते लखनऊ आणि हाथरसपर्यंत लोकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला आहे. सोशल मीडियावर देखील लोक आपला राग व्यक्त करत आहेत. ट्विटरवर हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण टॉप ट्रेंड करत आहे. ट्विटरवर लोक पीडितेला न्याय मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2EJapOX

No comments:

Post a Comment