चंद्रपूर: मंत्री व लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन दिवसांत ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना लागण झाल्यानंतर आता माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनाही करोनाने गाठले आहे. मुनगंटीवार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 'माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव् आला आहे. त्यानंतर मी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली आहे. आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी हे सातत्यानं आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पोलीस, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते व लोकांशी त्यांचा संपर्क येत आहे. हे सर्व करताना खबरदारी घेऊनही करोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. वाचा: आतापर्यंत राज्यात अनेक मंत्र्यासह आजी-माजी आमदार, खासदारांना करोनाचा सामना करावा लागला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, सुनील केदार यांना करोनाची लागण झाली होती. यातील बहुतेकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. प्रकाश सुर्वे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, रवी राणा, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, अतुल बेनके, अभिमन्यू पवार, कालिदास कोळंबकर, माधव जळगावकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, अमरनाथ राजूरकर तसेच विधान परिषद सदस्य गिरीश व्यास, सुजितसिंह ठाकूर, नरेंद्र दराडे आणि सदाभाऊ खोत यांनाही कोविडचा सामना करावा लागला आहे. राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला सरासरी २० हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cd0Y6T
No comments:
Post a Comment