नागपूर: धडाकेबाज सनदी अधिकारी अशी ओळख असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी करोनावर मात केली आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. महापालिकेचे आयुक्त म्हणून नागपूरमधील करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी हिरीरीनं लढणाऱ्या मुंढे यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते होम क्वारंटाइन होते. क्वारंटाइन असतानाच राज्य सरकारनं त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर बदली केली. या बदलीमुळे क्वारंटाइन असतानाही ते चर्चेत आले होते. जवळपास १२ दिवसांच्या अलगीकरणानंतर त्यांनी पुन्हा एकदा करोना चाचणी केली. त्यांचा हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. वाचा: रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ट्वीट करून त्यांनी महत्त्वाचा संदेश सर्वसामान्यांना दिला आहे. 'मी लवकरच ठणठणीत होईन. माझा कोविड १९ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह विचार आणि कृतीनेच कोविडशी लढा देण्याची गरज आहे. प्रबळ इच्छाशक्ती, नेमके उपचार व उपाययोजना, सामूहिक काळजी यातूनच कोविडच्या संकटावर मात करता येऊ शकते. चांगल्या भविष्यासाठी व आरोग्यासाठी सामूहिक सामाजिक कृतीची गरज आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंढे हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान २४ ऑगस्ट रोजी झाले होते. त्यांच्यात करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. मात्र, नियमानुसार ते होम क्वारंटाइन झाले होते. महापालिका आयुक्तपदावरून बदली होऊपर्यंत घरातूनच ते काम पाहत होते. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bA1cEU
No comments:
Post a Comment