Breaking

Tuesday, September 1, 2020

रोहित पवार यांचा 'त्या' संघटनेला विरोध; म्हणाले, मी राष्ट्रवादीचा आमदार https://ift.tt/32KoQKQ

पुणे: राष्ट्रवादीचे आमदार यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला असून ही संघटना बरखास्त करण्याचं अप्रत्यक्ष आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. रोहित पवार यांची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळेच काही काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, चाहत्यांनी घेतलेला हा निर्णय पवार यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त करतानाच आपण राष्ट्रवादीचे आमदार आहोत, याची जाणीवही कार्यकर्त्यांना करून दिली आहे. 'माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील,' असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनी राजकारणात पाऊल टाकल्यापासून तरुणांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या निवडणूक प्रचार सभांना तरुणांची मोठी गर्दी असते. सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिक्रियांनाही तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतो. रोहित पवार आमदार झाल्यापासून त्यांच्या चाहत्यांची संख्या अधिकच वाढली आहे. त्यामुळेच नांदेडच्या काही तरुणांनी एकत्र येऊन '' नावाची अराजकीय संघटना स्थापन केली. पवार यांची कोणतीही परवानगी न घेता ही संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेनं कार्यही सुरू केलं आहे. शिवाय या संघटनेची पदंही वाटप करण्यात आली आहेत. ही संघटना केवळ नांदेडपर्यंत मर्यादित राहिली नसून तिचा विस्तार लातूर, नाशिकपर्यंत करण्यात आला आहे. याची माहिती मिळताच रोहित पवार यांनी त्याची गंभीर दखल घेऊन या कार्यकर्त्यांना ही संघटना स्थापन न करण्याची विनंती केली आहे. शिवाय आपण राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून देत राष्ट्रवादीलाच बळ देण्याचं आवाहनही त्यांनी अप्रत्यक्षपणे या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते ही संघटना बरखास्त करतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lFu17c

No comments:

Post a Comment