Breaking

Saturday, September 5, 2020

खडसे हे भाजपचे बाहुबली; त्यांना कट्टापाने मारले: अब्दुल सत्तार https://ift.tt/3i3skhZ

औरंगाबाद: हे भाजपचे बाहुबली आहेत. त्यांना कट्टपाने मारले, अशा शब्दात राज्यमंत्री आणि शिवसेना नेते भाजपमधील खडसे-फडणवीस वादावर टोला लगावला. यावेळी त्यांनी खडसे यांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली. शिवसेनेतून खडसेंना पक्षप्रवेशाची पहिल्यांदाच खुली ऑफर देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी खडसे यांना ही ऑफर दिली. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यापार्श्वभूमीवर सत्तार यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी खडसे-फडणवीस वादाला आपल्या मिश्किल शैलीतून फोडणी दिली. कट्टपाने बाहुबलीचा वध कशासाठी केला? खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. त्यामुळेच त्यांचा पक्षातून बिसमिल्लाह करण्यात आला, असा चिमटा काढतानाच ते खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. त्यांच्यावर अन्याय झाला, पण ते फक्त भावना व्यक्त करतात निर्णय घेत नाहीत. खडसेंमुळे शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी त्यांनी ओबीसींना घेऊन शिवसेनेत प्रवेश करावा. मी स्वत: त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन. खडसे शिवसेनेत आले, तर भविष्य अधिक उज्ज्वल असेल, असं सत्तार म्हणाले. कंगनाने माफी मागावी यावेळी त्यांनी कंगना राणावत प्रकरणावरही भाष्य केलं. 'अभिनेत्री कंगना राणावत त्वरीत जाहीर माफी मागावी, तरच या विषयाला पूर्णविराम लागेल,' असे मत राज्यमंत्री सत्तार यांनी केले. खडसे काय म्हणाले? मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर हल्ला चढविला होता. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले होते. 'मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता', असा दावा खडसे यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3i3skP1

No comments:

Post a Comment