ग्वाल्हेर: नवरात्रीच्या (Navaratri) दिवसांमध्ये कॅबिनेट मंत्री (Imarti Devi) यांच्यासाठी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करत माजी मुख्यमंत्री () हे आता सर्व बाजूंनी घेरले गेले आहेत. एका दलित महिलेला म्हटल्यानंतर एकीकडे भारतीय जनता पक्षाने कमलनाथ यांना निशाणा बनवलेला असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर देखील कमलनाथ यांच्यावर राग व्यक्त केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत इमरती देवी यांना देवीच्या ( मर्दिनी) रुपात दाखवण्यात आले आहे, तर त्यांच्या पायांजवळ कमलनाथ यांना महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे. (photo of kamalnath and got viral as and ) डबरा येथील निवडणूक प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांना आयटम म्हटले आणि राजकीय पार एकदम वर उसळला. भारतीय जनता पक्षाने कमलनाथ यांचे हे वक्तव्य दलितविरोधी असल्याचे सांगत त्यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. या वक्तव्याबाबत कमलनाथ यांच्याविरोधात निवडणूक आयोगासह पोलिसात तक्रार दाखल करू, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध करत भारतीय जनता पक्षाने जिल्हा मुख्यालयात दोन तासांचे मौन धरणे देखील धरले. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो कोणी पोस्ट केला किंवा कोठून आला याबाबत माहिती नाही. मात्र यूजर्सनी हा फोटो जलदगतीने फॉरवर्ड करत आहेत. या व्हायरल फोटोत दुर्गामातेचे महिषासूर मर्दिनीचे रुप दाखवण्यात आले आहे. यात देवीच्या चेहऱ्याच्या जागी इमरती देवी यांचा चेहरा लावण्यात आला आहे, तर खाली कोसळलेल्या महिषासुराला कमलनाथ यांचा चेहरा लावण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- यात दुर्गामाता महिषासुराचा वध करताना दाखवण्यात आले आहे. यावरून येणाऱ्या दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात कमलनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य आणखी राजकीय भूकंप घडवणार आहे, असे दिसते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TmQ9GR
No comments:
Post a Comment