Breaking

Tuesday, October 20, 2020

ट्रेनखाली आल्याने दोन हत्ती ठार; रेल्वे इंजिन जप्त, चालक निलंबित https://ift.tt/2Hnl2Io

गुवाहाटी: आसामच्या वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी एका मालगाडीचे इंजिन जप्त केले आहे (). याच मालगाडीखाली येत आणि त्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता (). ही दुर्घटना २७ सप्टेंबरची आहे. ही घटना हत्या असून मालगाडीचे इंजिन हे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार असल्याचे मानले गेले. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. रेल्वेच्या रुळांवर हत्तींचे मरणे बंद व्हायला पाहिजे,असे आसामचे पर्यावरण आणि वनमंत्री परिमल सुखाबैद्य यांनी म्हटले आहे. वन विभाग रेल्वेविरुद्ध कारवाई करताना अयशस्वी होणार नाही, असा विश्वासही सुखाबैद्य यांनी व्यक्त केला आहे. वन विभाग करत आहे चौकशी प्रभागीय वन अधिकारी राजीब दास यांना वन विभागाने चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ट्रेनचे इंजिन हे हत्येसाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारासारखे आहे. आम्हाला गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करणे आवश्यक असते. हे ट्रेनचे इंजिन आहे. हे हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारासारखे आहे. ट्रेनचा चालक आणि सह-चालक निलंबित वन विभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अंतर्गत रेल्वे अधिकाऱ्यांच्या विरोधात या प्रकरणी कठोर पावले उचलण्यात येत आहेत, असे आसामचे मुख्य वन्यजीव वॉर्डन महेंद्रकुमार यादव यांनी सांगितले. रेल्वेने या प्रकरणी अंतरिम चौकशी केली होती. लोको पायलट आणि त्याच्या सहाय्यकाला निलंबित केले होते. मंगळवारी इंजिन जप्त करण्यात आले. लुमडिंग रिझर्वमधील क्षेत्रात ट्रेनची गती प्रतिबंधित केली जावी, कारण येथे जंगली हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो असे रेल्वे अधिकाऱ्यांना लिखित निर्देश देण्यात आले असल्याचे यादव यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- ४५ दिवसांसाठी कोठडीत गेले इंजिन हे इंजिन जप्त केल्यानंतर ते सोडवण्यात आले असा ईशान्य सीमांत रेल्वे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. मात्र, रेल्वे इंजिन जप्त केल्यानंतर ते ४५ दिवसांसाठी रेल्वेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे दास यांनी सांगितले. चौकशीसाठी आवश्यकता भासल्यास आम्ही पुन्हा इंजिन मागवू शकतो. जर रेल्वेच्या कोठडीत रेल्वे इंजिनाचे काही नुकसान किंवा काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची असेल, असेही दास पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31sxNZ9

No comments:

Post a Comment