नवी दिल्ली: भारत आता आपल्या कोविड-१९च्या (Covid-19) क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा (Clinical Management Protocol) आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. च्या उपचारासाठी वापरण्यात येणारी चार औषधे प्रभावी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनात सिद्ध झाले आहे. रेमडेसिवीर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅविर आणि इंटरफेरॉन ही औषधे कोविड-१९ वर फारशी उपयोगाची नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या औषधचा भारतासह जगभरात सुरू असलेला प्रयोग मात्र सध्या सुरूच ठेवण्यात येणार आहे. जो पर्यंत ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीकडून सूचना मिळत नाहीत, तो पर्यंत रेमडेसिवीरचा वापर सुरूच राहील, असे ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीट्यूटचे संचालक समीरण पांडा यांनी म्हटले आहे. 'रेमडेसिसीवीरवर आणखी संशोधनाची आवश्यकता' नॅशनल टास्क फोर्स आणि जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपशी चर्चा केल्यानंतर समीक्षा केली जाईल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या क्लिनिकल प्रोटोकॉलचा आढावा घेऊ आणि त्यात आवश्यकते बदल करू, असे आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्हाला पुढे रेमडेसिवीरचा उपयोग करायचा आहे की नाही, हे ठरविण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. आम्ही सॉलिडॅरिटी ट्रायलच्या पुराव्यांती समीक्षा करत आहोत, असेही अधिकारी म्हणाला. सध्या का सुरू ठेवावी ट्रायल? या औषधाचा परिणाम होत नसल्याचे अंतरिम परिणामावरून स्पष्ट होत आहे, मात्र रेमडेसिवीरचा एखाद्या सब-ग्रुपला फायदा होतोय की नाही हे पाहण्यासाठी ट्रायल मात्र सुरूच ठेवली जाईल असे ट्रायलच्या स्टीयरिंग कमिटीचे के. श्रीनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात या औषधाचा किती परिणाम होतो यासाठी हजारो लोकांची तपासणी करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सहा महिने हा अभ्यास केला. रेमडेसिवीर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅवीर आणि इंटरफेरॉन या औषधांचा कोविड-१९च्या रुग्णांवर अतिशय कमी परिमाम जाणवला किंवा अजिबातच परिणाम जाणवला नसल्याचे या अभ्यासात आढळून आले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31i5ug1
No comments:
Post a Comment