Breaking

Saturday, October 3, 2020

हाथरस: प्रियांका गांधींचे उत्तर प्रदेश सरकारला तीन प्रश्न?, म्हणाल्या... https://ift.tt/36tojQH

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष () आणि सरचिटणीस वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी हाथरस सामूहिक बलात्काराची () शिकार दलित मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जात भेट घेतली. आम्हाला कोणतीही शक्ती गप्प बसवू शकत नाही असे या भेटीनंतर राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर, प्रियांका गांधी यांनी ट्विट करत पीडित कुटुंबाचे प्रश्न सरकारपुढे मांडले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली. प्रियांका गांधी यांनी मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्कारासंबंधी तीन प्रश्न विचारले आहेत.( asked three questions to the uttar pradesh government) या संपूर्ण प्रकरणाची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये. आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला असा प्रश्नही त्यांनी पीडित कुटुंबाच्या वतीने विचारला. आमची अनेकदा दिशाभूल करण्यात आली. आम्हाला धमकी का दिली जात आहे? आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेतून फूल निवडून आणले, मात्र तो मृतदेह आमच्याच मुलीचा हो की नव्हता हे आम्ही कसे मानायचे?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळवणे हा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, असे प्रियांका म्हणाल्या. दरम्यान, हाथरस घटनेनंतर देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी हाथरसला भेट देत पीडित कुटुंबाची भेट घेतली. कोणतीही शक्ती आम्हाला गप्प बसवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाच्या भेटीनंतर व्यक्त केली. क्लिक करा आणि वाचा- शनिवारी दुपारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसला निघाल्यानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने डीएनडी टोलनाका बंद केला. राहुल गांधी तेथे पोहोचल्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आले, मात्र काँग्रेसत्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर प्रशासनाने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्याची सशर्त परवानगी दिली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2GwxwwW

No comments:

Post a Comment