नवी दिल्ली: महासाथ पसरवणारा नवीन करोना विषाणू , स्मार्टफोन, काचेवर आणि स्टेनलेस स्टीलवर सामान्यत: २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. व्हायरोलॉजी जर्नलमध्ये ऑस्ट्रेलियायी राष्ट्रीय विज्ञान संस्थेने केलेले हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार सार्स-सीओव्ही-२ दीर्घ काळापर्यंत पृष्ठभागांवर जीवंत राहू शकतो. या मुळे पुन्हा एकदा नियमित हात धुणे आणि पृष्ठभागांना सतत स्वच्छ करण्यासारख्या स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. सार्स-सीओव्ही-२ कमी तापमानात आणि काच, , प्लास्टिकची शीट अशा छिद्र नसलेल्या गुळगुळीत पृष्ठभागांवर छिद्र असलेल्या पृष्ठभागांच्या तुलनेत अधिक काळ जीवंत राहतो, असे ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिजीज प्रिपेयर्डनेस (एसीडीपी) येथे करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. प्लास्टिकच्या बँकेच्या नोटांच्या तुलनेत कागदी नोटांवर करोनाचा विषाणू अधिक काळ अस्तित्वात राहू शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्था सीएसआयआरओमधील संशोधकांना आढळून आले आहे. एखाद्या पृष्ठभागावर विषाणू किती दीर्घकाळ जीवंत राहतो हे सिद्ध झाल्याने आपण विषाणूचा प्रसार आणि त्याचे शमन यासंदर्भात अचून भविष्यवाणी करू शकतो. तसेच लोकांना विषाणूपासून वाचवण्याचे काम देखील चांगल्या पद्धतीने करू शकतो, असे सीएसआयआरओचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी मार्शल यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- २० डीग्री सेलियसवरील सामान्य तापमानात मजबूत असल्याचे आढळले आहे. आणि तो मोबाइल फोनच्या स्क्रीनची काच, प्लास्टिक बँकनोटसारख्या गुळगुळीत पृष्ठभागांवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो, असे एसीडीपीचे उपसंचालक डेबी ईगल्स यांनी म्हटले आहे. प्रयोगादरम्यान जसे तापमान वाढत गेले, तसे त्याचा जीवंत राहण्याचा कालावधी देखील कमी कमी होत गेल्याचे त्या म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30YlZxA
No comments:
Post a Comment