Breaking

Thursday, October 1, 2020

पार्थच्या प्रत्येक मतावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा... अजित पवार स्पष्टच बोलले! https://ift.tt/3l0JnC4

पुणे: 'हल्लीची पिढी ट्विटरवर स्वत:ची मतं व्यक्त करते. पार्थनंही त्याचं मत व्यक्त केलंय. त्याच्या प्रत्येक ट्वीटवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा महत्त्वाची इतर अनेक कामं माझ्याकडं आहेत. माझ्याकडं अनेक जबाबदाऱ्या आहेत,' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपले चिरंजीव यांनी केलेल्या एका ट्वीटवर दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारनं मराठा संघटनांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, मराठा संघटनांनी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यातच बुधवारी बीडमधील एका विद्यार्थ्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काल ट्वीट केलं. 'अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घालावं,' असं पार्थ यांनी म्हटलं होत. तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. पार्थ यांच्या या ट्वीटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. वाचा: महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं पुण्यात आज अजित पवार यांनी रेल्वे स्थानक परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना पार्थ यांच्या ट्विटबाबत विचारलं असता, पार्थच्या ट्वीटशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'प्रत्येकाला स्वत:ची मतं आहेत. कोणी काय ट्वीट करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता का?, असा प्रश्न त्यांनी केला. 'मराठा, धनगर यांच्यासह सर्वच समाजाला त्यांचा न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशीच पक्षाची भूमिका आहे. माझी बहीण सुप्रिया सुळे यांनीही पार्थच्या ट्वीटवर पक्षाची भूमिका मांडली आहे. पार्थच्या प्रत्येक मतावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही,' असंही ते म्हणाले. पार्थ पवार यांनी यापूर्वी राम मंदिर भूमिपूजन व सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य केलं होतं. पक्षानं त्यांची भूमिका वैयक्तिक असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर पार्थच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यामुळं नव्या ट्वीटवर पक्ष काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता होती. अजित पवार यांनी मात्र पार्थ यांच्या भूमिकेचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे. पार्थ पवार यांनी केलेलं 'ते' ट्वीट वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ERXM4l

No comments:

Post a Comment