Breaking

Thursday, November 19, 2020

लाचखोरीत भारत ७७व्या स्थानी https://ift.tt/2IR5ygn

नवी दिल्ली : व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या २०२०च्या जागतिक यादीत ४५ गुणांसह ७७व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या यादीत देशाचा ४८ गुणांसह ७८वा क्रमांक होता. '' या संस्थेने केलेल्या १९४ देश, प्रांत, स्वायत्त आणि अर्धस्वायत्त प्रदेशांतील व्यवसाय लाचखोरी जोखमीच्या मूल्यांकनातून हे अनुमान पुढे आले आहे. या वर्षीच्या नोंदीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, वेनेझुएला आणि एरिट्रियामध्ये लाचखोरीचा सर्वाधिक धोका आढळून आला, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंड हे याबाबतीत सर्वांत कमी जोखमीचे देश ठरले. सरकारसोबतचे व्यावसायिक संबंध, लाचलुचपत प्रतिबंध प्रणाली व अंमलबजावणी, सरकार व नागरीसेवा पारदर्शकता आणि माध्यमांच्या भूमिकेसह नागरी समाज निरीक्षणाची क्षमता या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून हे मूल्यांकन केले जाते. वाचा : वाचा : पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली आहे. पैकी चीनने सततच्या देखरेखीसह सरकारी अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी घटवल्याचे 'ट्रेस' आकडेवारी सांगते. दरम्यान, भूतान ३७ गुणांसह ४८व्या स्थानी आहे, तर भारताव्यतिरिक्त पेरू, जॉर्डन, उत्तर मॅसेडोनिया, कोलंबिया आणि माँटेनेग्रो यांच्या खात्यावरही प्रत्येकी ४५ गुण आहेत. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HhkqnO

No comments:

Post a Comment