नवी दिल्लीः करोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा सणांवर सावट आहे. पण भारतीयांची परंपरा उत्सवांची आहे. आज दीपावली आहे. या निमित्ताने सावधगिरी बाळगून उत्सव साजरा करणाऱ्याचे आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच जवानांच्या सन्मानार्थ आज दीप प्रज्वलित करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. 'सॅल्यूटटूसोल्जर्स' या हॅशटॅगचा वापर करून त्यांनी जवानांसाठी दिव्यासोबत आपला फोटो पोस्ट करण्याचं आवाहन केलं आहे. २०१४ पासून मोदी जवानांसोबत आपली दिवाळी साजरा करतात. यंदाही ते जवानांसोबत असतील. प्रदूषणमुक्त दीपावली साजरी कराः राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 'पर्यावरणपूरक' स्वच्छ दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा एक दिवा जवानांसाठीही लावा- मोदींचे आवाहन सर्वांच्या आरोग्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रार्थना संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी जवानांना दिल्या खास शुभेच्छा....
चीनच्या सीमेवरील तणावामुळे लडाखच्या दुर्गम भागात हजारो जवान तैनात उपस्थित आहेत. दुसरीकडे शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीच उल्लंघन करत गोळीबार केला. यात भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले. भारताकडून पाकिस्तानला चोखप्रत्युत्तर देण्यात येत आहे. जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवर आणि इतरत्र तैनात असलेले जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष करून दीपावलीच्या शुभेच्छा देत विशेष अभिवादन केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JZ1Kds
No comments:
Post a Comment