नवी दिल्ली: भारत सरकार () अमेरिकेची प्रसिद्ध बायोटेक (Biotech) कंपनी मॉडर्नाशी (Moderna) कोविड लशीच्या निर्मितीवर सतत संपर्कात आहे. आपली लस करोना विषाणूचा (Coronavirus) खात्मा करण्यात ९४.५ टक्के सफल असल्याचे सोमवारी मॉडर्नाने दावा केला आहे. मॉडर्नाव्यतिरिक्त भारताकडून आणखी एका कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. (india is in dialogue with and other for ) कोविड-१९च्या विरुद्ध टीके-एम आरएनए-१२७३च्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र डेटा सुरक्षा देखरेख मंडळाने (डीएसएमबी) ही लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचे म्हटले आहे. यावर भारत सरकारच्या सूत्रांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही केवळ मॉडर्नाच्याच नाही, तर फायझप, सीरम इन्स्टीट्यूट, भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाशी देखील प्रत्येक परीक्षाच्या प्रगतीबाबत संपर्कात असल्याचे भारत सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. गरज भासल्यास नियमांमध्ये शिथिलता नवे औषध आणि कॉस्मेटिक नियम २०१९ नुसार, जर एखाद्या लशीचे परीक्षण झालेले असेल आणि भारताबाहेर लशीला नियामक मंजुरी मिळाली असेल, तरी देखील लशीच्या सुरक्षित नियामक मंजुरीसाठी भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लीनिकल परीक्षण करावे लागणार आहे. मात्र, आपातकाल आणि महासाथीसारख्या परिस्थितीमध्ये या नियमांमध्ये शिथिलता आणली जाऊ शकते. इतर कंपन्यादेखील प्रभावी लशी तयार करत आहेत कँब्रिज, मेसाच्युसेट्स येथील मॉडर्नाच्या घोषणेनंतर आमची कोविड-१९वरील लस करोनाचा संसर्ग रोखण्यात ९० टक्क्यांहून प्रभावी असल्याचे एका आठवडाभरापूर्वी फायझर आणि बायोएनटेकने म्हटले होते. हा आमच्या लशीच्या विकासाचा निर्णायक क्षण आहे. जगभरातील अधिकाधिक लोकांना वाचवता यावे सासाठी आम्ही जानेवारीच्या सुरुवातीपासून या विषाणूची तपासणी केली आहे, असे मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बांसेल यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- देशी लस देखील तिसऱ्या टप्प्यात करोनाच्या या संकटकाळात देशी लशीबाबत देखील दिलासादायक वृत्त आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आता चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. या लशीचे दोन टप्प्यातील परीक्षण यशस्वी झाले असून आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36XfKwr
No comments:
Post a Comment