Breaking

Tuesday, November 17, 2020

भारत आणि चीनमध्ये होऊ शकते रशियन लशीचे उत्पादन: पुतीन https://ift.tt/38QAath

मॉस्को: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ब्रिक्स देशांच्या संमेलनात लस विकसित करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही या लशीचे उत्पादन भारत आणि चीन या सदस्य देशांमध्ये सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना त्याला अटकाव करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी करोनाच्या मुद्यावरून एकमेकांसोबत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत, ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या 'ब्रिक्स'ची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना पुतीन यांनी सांगितले की, ब्रिक्स देशांद्वारे लस विकसित करणे आणि संशोधनासाठी केंद्र स्थापन करण्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेने केलेल्या सूचनेवर सहमत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. ब्रिक्सच्या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्रपती जॅर बोल्सोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांनी सहभाग घेतला. वाचा: रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पुतीन यांनी सांगितले की, रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' लशीचे उत्पादन भारत आणि चीन या ब्रिक्स देशांमध्ये करता येऊ शकते. रशियाच्या प्रत्यक्ष गुंतवणूक निधीने स्पुटनिक- व्ही लशीच्या चाचणीबाबत ब्राझील आणि भारतीय भागिदारांसोबत करार केला आहे. त्याशिवाय चीन आणि भारतातील औषध कंपन्यांसोबत लस उत्पादनाबाबत करारही केला आहे. या देशांमध्येच लशीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर देशांतर्गत आवश्यक मागणीची पूर्तता होईल आणि हे देश इतर देशांनाही लशीचा पुरवठा करू शकतील, असेही पुतीन यांनी सांगितले. वाचा: वाचा: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. 'स्पुटनिक व्ही' लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. ही लस ९२ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38RfEsH

No comments:

Post a Comment