Breaking

Tuesday, November 17, 2020

दोन गटांत हाणामारी; आमदार पडळकर यांच्या भावासह १२ जणांवर गुन्हा https://ift.tt/38U8RP4

सांगली: चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार मंगळवारी (ता. १७) दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात घडला. याबाबत शांताबाई मारुती मासाळ (वय ६०, रा. मासाळवाडी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह दोन्ही गटातील बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा: आटपाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर हे मंगळवारी दुपारी काही मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. यातील काहीजण चपला घालून मंदिरात गेल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यावरून दोन गटात वादाला सुरुवात झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गट आमनेसामने भिडले. यात दोन्हीकडील वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली. याबाबत शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार ब्रह्मानंद पुंडलिक पडळकर (रा. झरे) गणेश भुते (रा. भिंगेवाडी), नवनाथ मारुती सरगर (रा. झरे), अनिल सूर्यवंशी (रा. गोंदिरा), विठ्ठल पाटील (रा. वेळापूर, जि. सोलापूर) आणि सत्यजीत पाटील (रा. विटा) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्या फिर्यादीनुसार मासाळवाडीतील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारामारीच्या घटनेत पडळकर आणि त्याच्या मित्रांनी गळ्यातील मंगळसूत्र तोडले, तसेच मंदिराबाहेर लावलेल्या गाडीतील ८२ हजार रुपये लांबवल्याची तक्रार शांताबाई मासाळ यांनी फिर्यादीत केली आहे. आटपाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pDeruO

No comments:

Post a Comment